मराठा आरक्षण देण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका

मराठा आरक्षण देण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका

मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तीच भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही. हा आजचा प्रश्न नसून अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण भाजप सरकारने सर्वोच्च न्यायालयात ‘इम्पिरिकल डेटा’ दिला नाही म्हणून गेले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केली.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. मराठा समाजाने मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा तीन महिन्यांपूर्वी केली होती. पण सरकारने या तीन महिन्यांत काहीच हालचाल केली नाही. आता मात्र मराठा समाजाची अडवणूक केली जात आहे. मुंबईत वाहतूक व्यवस्थेसह परिस्थिती बिघडल्याचे सांगितले जात आहे. पण मुंबईतील आजच्या परिस्थितीस भाजप सरकारच जबाबदार आहे. मुंबईतील परिस्थितीसाठी मराठा आंदोलकांना बदनाम करू नका, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईत रात्री भेटून चर्चा केली आणि  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाया पडून शपथ घेतली होती. शासन निर्णय  काढण्याचे आश्वासन दिले.  गुलाल उधळला आणि  शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आंदोलक  विजयी भावमुद्रेने गावाकडे परत गेले. आता शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? मराठा समाजाला पुन्हा आंदोलन करण्याची वेळ का आली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

फडणवीसांच्या घोषणेचे काय झाले?

मला सत्ता द्या, सात दिवसांत मराठा आरक्षण देतो, अशी वल्गना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचे काय झाले? असा संतप्त सवाल करत भाजप सरकारला आरक्षणाच्या नावाखाली फक्त मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे लावायची आहेत, असा आरोपही सपकाळ यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Virar building collapse – विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांना अटक, न्यायालयात हजर करणार Virar building collapse – विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांना अटक, न्यायालयात हजर करणार
विरारमधील ‘रमाबाई अपार्टमेंट’ या चार मजली इमारतीचा भाग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. या इमारत दुर्घटनेच्या तपासाला आता वेग आला...
नोकरी! एनएचपीसीमध्ये 248 पदांसाठी भरती
खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स बंद ठेवण्याचे अलिखित आदेश; आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडलाय का? – रोहित पवार
जपानमध्ये फक्त दोन तास स्मार्टफोन वापरा
बीएसएनएलची भारत फायबर सर्व्हिस प्लॅनवर सूट
एआय नोकऱ्यांसाठी हुशार उमेदवार मिळेना, 10 पैकी केवळ एकच इंजिनीअर पात्र
टॅरिफमुळे हिंदुस्थानला 52 लाख कोटींचे नुकसान, छोट्या उद्योगांना मोठा झटका; लाखो नोकऱ्यांवर गंडांतर