मध्य रेल्वेवर उद्या ठाणे ते कल्याणदरम्यान मेगाब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवारी ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मुख्य मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार आहे. या काळात अनेक अप मेल/एक्स्प्रेस गाडय़ा कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच डाऊन मेल/एक्स्प्रेस गाडय़ा ठाणे व कल्याणदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित गाडय़ा गंतव्यस्थानी 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत. हार्बर मार्गावर पुर्ला–टिळकनगर विभागात ट्राफिक ब्लॉक राहील, तर ट्रान्स–हार्बर मार्गावर ब्लॉक राहणार नाही, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List