सुप्रीम कोर्ट परिसरात रील काढण्यास बंदी
On
सर्वोच्च न्यायालयातील मुख्य कॅम्पसला उच्च सुरक्षा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे आता या परिसरात इन्स्टा रील आणि व्हिडीओग्राफी काढण्यास बंदी घातली आहे. यासंबंधीचे परिपत्रक सुप्रीम कोर्टाने माध्यमांसाठी जारी केले आहे. मुलाखती आणि लाईव्ह प्रक्षेपण फक्त कमी सुरक्षा असलेल्या लॉन परिसरातच करता येईल. जर माध्यम कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले तर एका महिन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
13 Sep 2025 14:03:59
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येताच महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना...
Comment List