बेपत्ता नौसैनिकाचा शोध लागेना, नौदलासह नेरळ पोलिसांच्या पथकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू

बेपत्ता नौसैनिकाचा शोध लागेना, नौदलासह नेरळ पोलिसांच्या पथकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू

हिंदुस्थानी नौदलातील सैनिक काही दिवसांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाला होता. सूरज सिंह (29) असे या जवानाचे नाव असून मुंबईच्या एफटीटीटी विभागात त्यांची नेमणूक झाली होती. दरम्यान आठ दिवसांपूर्वी ते अचानक गायब झाले. नौदलाने या सैनिकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शेवटचे लोकेशन कर्जतच्या जंगलात असल्याचे समजले. त्यानुसार नौदलाने नेरळ पोलिसांच्या पथकांनी शर्थीचे प्रयत्न करत पूर्ण जंगल पिंजून काढले. मात्र या बेपत्ता नौसैनिकाचा अद्याप शोध लागलेला नाही.

एफटीटीटी येथे नेमणूक झाल्याने सूरज सिंह मुंबईतील नेव्हीनगर, कुलाबा येथील अधिकृत निवासस्थानी राहत होते. मात्र 7 सप्टेंबरला सकाळपासूनच ते बेपत्ता झाले. नौदलाच्या जवानांनी त्यांचा शोध घेतला. त्यांचा फोनही बंद असल्याने नौदलाने कफ परेड पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी त्यांच्या मोबाईल लोकेशनच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे शेवटचे लोकेशन कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे स्थानक परिसरातील पाळी-भूतिवली धरणाजवळील जंगलात असल्याचे कळले.

नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरात शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेत वैभव नाईक यांच्या सह्याद्री मित्र माथेरान रेस्क्यू टीम, एमएमआरसीसी रेस्क्यू सदस्य व ग्रामस्थांनीही सहभाग घेतला आहे.

सीसीटीव्ही तपासले
कर्जत तालुक्यात सूरजचे शेवटचे लोकेशन सापडल्याने पोलिसांच्या एका पथकाने कर्जतच्या गर्दीच्या आणि रहदारीच्या ठिकाणांवरील सर्व सीसीटीव्ही तपासले. तसेच धरण परिसर, जंगल, डोंगराळ भागात या पथकांकडून दररोज शोधमोहीम सुरू आहे. पहाटेपासून सुरू झालेली ही शोधमोहीम संध्याकाळपर्यंत केली जात आहे. पोलिसांसह नौदलाच्या जवानांकडून परिसरातील सर्व संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस ! महायुती सरकारकडून कर्जमाफीचे गाजर; बळीराजाला फसवले, थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाची नोटीस !
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येताच महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना...
अंगात सिंदूर नव्हे तर अंगात देशभक्ती भिनली पाहिजे, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना जोरदार टोला
बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सर्व भाजपच्या लोकांनी औकातीत रहावं, उद्धव ठाकरे यांचा इशारा
Israel Attack On Gaza : इस्रायलचा गाझावर पुन्हा प्रहार, 50 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
“जय शहा, भाजप मंत्र्यांची मुलं भारत-पाकिस्तान सामना पाहायला जातील, पण प्रखर राष्ट्रभक्त…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये येणार महिला राज; 34 पैकी 18 ठिकाणी महिला आरक्षण जाहीर
माकडाची दुचाकीवर झडप अपघातात पती ठार; पत्नी जखमी