मुंबई ते बीड एका चार्जमध्ये गाठणार; Volvo ची नवीन इलेक्ट्रिक कार सादर, BMW ला देणार टक्कर
आघाडीही कार उत्पादक कंपनी व्होल्वो कार्स इंडियाने हिंदुस्थानात आपली EX30 EV सादर केली आहे. कंपनी आपली ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सप्टेंबरमध्ये लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. देशात या कारची स्पर्धा BMW iX1 LWB शी होणार आहे. यातच फीचर्स, बॅटरी आणि रेंजमध्ये कोणती कार आहे जबरदस्त, हे आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
डायमेंशन्स
व्होल्वो EX30 ही कॉम्पॅक्ट SUV आहे, जिची लांबी 4,233 mm, रुंदी 1,838 mm, उंची 1,550 mm आणि व्हीलबेस 2,650 mm आहे. याउलट BMW iX1 LWB ही मोठी कार आहे, जिची लांबी 4,616 mm, रुंदी 1,845 mm, उंची 1,612 mm आणि व्हीलबेस 2,800 mm आहे. म्हणजेच, BMW iX1 सर्व डायमेंशन्समध्ये मोठी आहे, ज्यामुळे तिच्यात जास्त स्पेस मिळेल, तर व्होल्वो EX30 शहरात ड्रायव्हिंगसाठी अधिक सोयीस्कर ठरेल.
बॅटरी आणि रेंज
बॅटरी आणि रेंजच्या बाबतीत दोन्ही कार जवळपास समान आहेत, पण काही फरक आहेत. व्होल्वो EX30 मध्ये मागील एक्सलवर असलेल्या सिंगल मोटरशी जोडलेला एकच 69 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. जो 272 bhp पॉवर आणि 343 Nm टॉर्क निर्माण करतो. EX 30 सुमारे 8-वर्षांच्या बॅटरी वॉरंटीसह येते आणि स्टँडर्ड फिटमेंट म्हणून वॉल बॉक्स चार्जर समाविष्ट आहे. पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार 480 किमी रेंज देऊ शकते, असा कंपनीचा दावा. व्होल्वोचा दावा आहे की, EX30 फक्त 5.3 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेगाने धावू शकते. तर याची टॉप स्पीड180 किमी इतकी आहे.
iX1 ही कार एकाच eDrive20L M Sport प्रकारात उपलब्ध आहे आणि त्यात 66.4 kWh बॅटरी पॅक आणि सिंगल PMSM इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. जी 204 hp पॉवर आणि 250 nm टॉर्क जनरते करते. एका पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार 531 किमीची रेंज देतो, असा दावा कंपनीने केला आहे. यात 130 kW DC चार्जर वापरून बॅटरी 29 मिनिटांत 10% ते 80% पर्यंत चार्ज करता येते. तसेच 11 kW AC चार्जर वापरून ही कार सुमारे 6.5 तासांत 0% ते 100% पर्यंत चार्ज करता येते. या EV SUV मध्ये 11 kW वॉल बॉक्स चार्जर येतो.
फीचर्स
दोन्ही कारांच्या इंटिरियर आणि फीचर्स प्रीमियम आहेत, पण डिझाइनमध्ये फरक आहे. व्होल्वो EX30 चा इंटिरियर मिनिमलिस्टिक आहे. ज्यात रिसायकल्ड मटेरियल्स (अॅल्युमिनियम, जीन्स, PVC) वापरले गेले आहेत. यात 12.3-इंच व्हर्टिकल टचस्क्रीन, 9-स्पीकर हार्मन कार्डन 1040W साउंड सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, इलेक्ट्रिक टेलगेट, LED हेडलॅम्प्स आणि टेल-लॅम्प्स, वायरलेस अॅपल कारप्ले, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जर, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, ऑटो हेडलॅम्प्स आणि वायपर्स, वन-पेडल ड्रायव्हिंग, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल विथ एअर प्युरिफायर आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
तर BMW iX1 मध्ये “वाइडस्क्रीन कर्व्ह्ड डिस्प्ले” (10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.7-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन), पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि 205W 12-स्पीकर हार्मन कार्डन साउंड सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List