Disha Patani News – दिशा पटानीच्या घरावर गोळीबार, गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली जबाबदारी
बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानीच्या उत्तर प्रदेशातील बरेली येथील घरावर गोळबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी (12 सप्टेंबर 2025) साडेचारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दिशा पटानीच्या घरावर फायरींग केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर रोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार गँगने घेतली आहे.
बरेली येथील सिव्हिल लाईन परिसरात दिशा पटानीचे वडील निवृत्त डिप्टी एसपी जगदीश पटानी राहतात. याच घरावर दुपारी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बॉलीवूड हादरून गेलं आहे. दरम्यान गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगने सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List