मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळजनक घटना, एसी कोचच्या शौचालयात आढळला चिमुकलीचा मृतदेह
मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. एसी कोचच्या शौचालयात एका पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस-कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोच बी 2 मधील टॉयलेटमधील कचरापेटीत एका प्रवाशाने मुलीचा मृतदेह पाहिला. त्यानंतर ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. प्रवाशांनी रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना प्रकरणाची माहिती दिली. अधिकारी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
मुलीच्या मावस भावानेच तिचे अपहरण केल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी लोकांचे जबाब नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे. तपासाअंती नेमकं काय घडलं ते समोर येईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List