कर्जदारांना दिलासा! दोन बँकांची व्याज दरात कपात
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि बँक ऑफ इंडिया (बीओआय) या दोन बँकांनी कर्जदार ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या दोन्ही बँकांनी कर्जाच्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून हा नियम 1 सप्टेंबर 2025 पासून लागू करण्यात आला आहे. या दोन्ही बँकांनी आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) कपात केली आहे. या निर्णयामुळे बँकेकडून गृहकर्ज, कार लोन, पर्सनल लोन घेणाऱ्या कर्जदारांना मोठा दिलासा मिळू शकतो. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या एमसीएलआरमध्ये 15 बेसिस पॉइंटपर्यंत कपात केली आहे.
ओव्हरनाइट एमसीएलआर 8.15 टक्क्यांवरून कमी करून 8 टक्के केला आहे. एक महिन्याचा एमसीएलआर 8.30 टक्क्यांवरून 8.25 टक्के झाला आहे. तीन महिन्यांचा दर 8.45 टक्के, सहा महिन्यांचा दर 8.65 टक्के, एक वर्षाचा 8.80 टक्के आणि तीन वर्षांचा एमसीएलआर 9.10 टक्के झाला आहे. बँक ऑफ इंडियाने एमसीएलआरमध्ये 5 ते 15 बेसिस पॉइंटची कपात केली आहे. एक महिन्याचा एमसीएलआर 8.30 टक्के, तीन महिन्यांचा 8.45 टक्के, सहा महिन्यांचा 8.70 टक्के, एक वर्षाचा 8.85 टक्के, तीन वर्षांचा एमसीएलआर 9.00 टक्के करण्यात आला आहे.
कर्जे स्वस्त होणार
एमसीएलआर कमी केल्यामुळे होम लोन, पर्सनल लोन, कार लोन इ.चे व्याज दर कमी होण्याची शक्यता आहे. बँकांनी ग्राहकांना एमसीएलआर ते ईबीएलआरमध्ये स्विच करण्याचा पर्यायसुद्धा दिला आहे. ग्राहकांना स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि कर्जदारांचा ईएमआय कमी करण्यासाठी या निर्णयाचा फायदा होईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List