हायकोर्टाच्या नवनिर्वाचित तीन न्यायमूर्तींनी घेतली शपथ

हायकोर्टाच्या नवनिर्वाचित तीन न्यायमूर्तींनी घेतली शपथ

मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आलेल्या अजित कडेठाणकर, सुशील घोडेस्वार आणि आरती साठे यांचा शपथविधी सोहळा आज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात पार पडला. या समारंभात नवनिर्वाचित न्यायमूर्तींनी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या उपस्थितीत गोपनीयतेची शपथ घेतली त्यामुळे उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या 69 झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून अजित कडेठाणकर, सुशील घोडेस्वार आणि आरती साठे यांची 28 जुलै रोजी शिफारस केली होती. त्यावर गेल्या आठवडयात केंद्र सरकारने नियुक्ती बाबत अधिसूचना काढली. अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर अजित कडेठाणकर, सुशील घोडेस्वार आणि आरती साठे यांचा शपथविधी सोहळा आज हायकोर्टात आयोजित करण्यात आला होता. नवनिर्वाचित न्यायमूर्तींच्या शपथविधी नंतर उच्च न्यायालयात आता  69 न्यायमूर्ती झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;