आता हद्दच झाली, पोलिसाने जपानी पर्यटकाकडून घेतली एक हजाराची लाच

आता हद्दच झाली, पोलिसाने जपानी पर्यटकाकडून घेतली एक हजाराची लाच

रस्त्याने प्रवास करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांकडून कागदपत्रांच्या नावाखाली चिरीमिरी घेणाऱ्या प्रोग्राममधील पोलीस कर्मचाऱ्याने हद्दच केली. हिंदुस्थान बघण्यासाठी आलेल्या जपानच्या एका पर्यटकाकडून 1 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी झोन ऑफिसर, एक पोलीस कर्मचारी आणि एका होमगार्डला डीसीपी डॉ. राजेश मोहन यांनी निलंबित केले आहे.

जपानी नागरिक केल्टो यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केला. त्यात त्यांनी म्हटले की, गुरुग्राम पोलिसांनी पावती न देता 1 हजार रुपयांची लाच घेतली. पोस्ट शेअर करताना केल्टो यांनी लिहिले, ‘व्वा! गुरुग्राम पोलिसांनी जपानी पर्यटकाकडून 1 हजार रुपयांची लाच घेतली. या अशा पोलिसांमुळे हिंदुस्थानची प्रतिमा खराब होते.’ हा व्हिडीओ व्हायरल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली.

डीसीपी ट्रॅफिक डॉ. राजेश मोहन यांनी तातडीने कारवाई करत यात सहभागी असलेल्या तिघांनाही निलंबित केले. यामध्ये झेडओ ईएसआय करण सिंह, हवालदार शुभम आणि होमगार्ड भूपेंद्र यांचा समावेश आहे. लाचखोरीविरुद्ध पोलिसांचे धोरण शून्य सहनशीलतेचे आहे. त्यामुळे या प्रकरणात तत्काळ कारवाई करत तिन्ही ट्रॅफिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे डीसीपी ट्रॅफिक डॉ. राजेश मोहन म्हणाले. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. यात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे...
मनोज जरांगे पाटील यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर त्यांचेही अभिनंदन – संजय राऊत
सौंदर्यासाठी गुलाबजल का आहे महत्त्वाचे?
जगभरात टॅरिफ बॉम्ब फोडणाऱ्या ट्रम्प यांना झटका; अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा Moody’s चा दावा
जम्मू कश्मिरमध्ये पावसाचे थैमान, रेल्वेच्या 30 सप्टेंबरपर्यंत 68 गाड्या रद्द
सरकारनं दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग होणार नाही; नवीन काहीही मिळालेलं नाही! – मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील
हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 1337 मार्ग ठप्प