गस्तीवर असताना वाहनाचे टायर फुटले, अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

गस्तीवर असताना वाहनाचे टायर फुटले, अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

महामार्गावर गस्तीवर असताना वाहनाचे मागचे टायर फुटल्याने पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात हा अपघात घडला.

नवल वसावे असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिरपूर-दहिवद फाटा येथे ही घटना घडली. महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना वाहनाचे मागचे दोन्ही टायर फुटले. अपघातग्रस्त वाहनात तीन पोलीस कर्मचारी होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी शिरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;