चिपी विमानतळावरून उड्डाणे पुन्हा सुरू होणार
तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेल्या चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत सुरू करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. गणेशोत्सवापूर्वीच चिपी विमानतळावरून विमानांची उड्डाणे पुन्हा सुरू होतील यासाठी प्रयत्न सुरू असून त्यामुळे गणपतीसाठी चाकरमान्यांना कोकणात जाण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाची सेवा काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद आहे. हे विमानतळ व्हीजीएफ (व्हायबलीटी गॅप फंडिंग) अंतर्गत सुरू करण्यासाठी केंद्राने परवानगी दिली आहे. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्हीजीएफमुळे चिपी विमानतळाची नाइट लँडिंगची समस्या दूर होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List