पाळीव कुत्र्यामुळे वाचले कुटुंबाचे प्राण, भूस्खलनात घर गेले पण जीव वाचले
हिमाचल प्रदेशात पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. मंडी शहरातील पड्डल वार्डमध्ये सोमवारी रात्री भूस्खलनाची घटना घडली. या भूस्खलनात एक कुटुंब चमत्कारीकरित्या बचावले आहे. पाळीव कुत्र्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे प्राण वाचले आहेत.
सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास मंडी शहरात भूस्खलन झाले. याचदरम्यान योगेश राणा यांचा पाळीव कुत्रा आणि गल्लीतील एक कुत्रा जोरजोरात भुंकू लागले. कुत्रे का भुंकत आहेत पाहण्यासाठी राणा हे छतावर गेले. याचवेळी त्यांचे लक्ष घरामागे कोसळणाऱ्या दरडीकडे गेले. त्यांनी तात्काळ कुटुंबीयांसह घराबाहेर धाव घेतली आणि संपूर्ण कुटुंबाचे प्राण वाचले. राणा यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना सुरक्षितस्थळी हलवले. पड्डल वार्डमध्ये भूस्खलनामुळे सहाहून अधिक घरांचं नुकसान झालं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List