अभिनेत्री रान्या रावला 102 कोटींचा दंड
सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली कारागृहात शिक्षा भोगत असलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला डीआरआयने तब्बल 102 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बंगळुरूच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या रान्या रावला डीआरआयच्या अधिकाऱयांनी 2 हजार 500 पानांची सविस्तर नोटीस पाठवली आहे.
3 मार्च 2025 ला दुबईहून परतलेल्या रान्या राव हिला बंगळुरू विमानतळावर अटक केली होती. तिच्या अंगझडतीत 14.8 किलो सोने सापडले होते. हे सोने जप्त केल्यानंतर तिला तत्काळ अटक करण्यात आली होती. या प्रकरणात केवळ रान्या नव्हे तर आणखी तीन आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. या तिन्ही आरोपींवर 50 कोटींहून अधिक दंड ठोठावला होता. रान्या ही वर्षभरात 30 हून अधिक वेळा दुबईला गेली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List