हिंदुस्थानवर अतिरिक्त टॅरिफ लावला नसता तर…; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात अस्थिरता निर्माण झाली आहे. तसेच ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लादलेल्या टॅरिफचा अमेरिकेतूनही विरोध होत आहे. ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादत हिंदुस्थानवर एकूण 50 टक्के टॅरिफ लादला आहे. याबाबत जगभरात विरोध होत असताना आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानवरील टॅरिफबाबत मोठे विधान केले आहे. ते पुन्हा एकदा हिंदुस्थानविरोधात बरळले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, टॅरिफ लादल्यानंतर हिंदुस्थानने अमेरिकेला सूट दिली होती. मात्र, आता त्याची वेळ निघून गेली आहे. तसेच आता हिंदुस्थानवर कोणतेही आणखी शुल्क लागू होणार नाही. तसेच आपण हिंदुस्थानवर टॅरिफ कोणतेही शुल्क लागू केले नसते तर त्यांनी अमेरिकेला सवलत देऊ केली नसते, असे ट्रम्प बरळले आहेत.
अध्यक्ष ट्रम्प यांनी स्कॉट जेनिंग्ज यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये म्हटले की टॅरिफ लादल्यानंतर हिंदुस्थानने अमेरिकेला सूट दिली होती. तसेच आता हिंदुस्थानवर आणखी कोणतेही टॅरिफ लादण्यात येणार नाहीत. आपण हिंदुस्थानवर कोणतेही टॅरिफ लादले नसते, तर त्यांनी अमेरिकेला ऑफरही दिली नसती, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प म्हणाले की, हिंदुस्थानने सर्व शुल्क ‘शून्य’ करण्याची ऑफर दिली होती. मात्र, आता त्याला खूप उशीर झाला आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये म्हटले होते की, काही लोकांना वाटते की आम्ही हिंदुस्थानसोबत खूप कमी व्यापार करतो, परंतु ते आमच्यासोबत खूप व्यापार करतात, ते आम्हाला मोठ्या प्रमाणात वस्तू विकतात, परंतु आम्ही त्यांना खूप कमी वस्तू विकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुनरुच्चार केला की हिंदुस्थान आपल्या देशांतर्गत हितांना प्राधान्य देईल आणि शेतकरी, लघु उद्योग आणि पशुपालकांच्या हिताशी तडजोड करणार नाही. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List