दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका

दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका

मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. आता यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सरकारच्या कायदाचा टाचणी एवढाही फायदा होणार नसल्याचे स्पष्ट मत मांडले. तर दुसरीकडे रोहित पवार यांनीही यावर भाष्य करत सरकारवर टीका केली आहे.

रोहित पवार यांनी बुधवारी सकाळी एक ट्विट केले. यात ते म्हणतात, मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने काल काढलेल्या GR मुळं मराठा समाजाचा विजय झाला असेल तर तो पूर्णतः मनोज जरांगे पाटील आणि त्यांना साथ देणाऱ्या सामान्य मराठा समाजाचा आहे. याबाबत त्यांचं मनापासून अभिनंदन! पण यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होतात.

मंत्रिमंडळ उपसमिती आधीही होती आणि आजही आहे. या समितीत मराठा नेत्यांसह गिरीश महाजन तर काल व्यासपीठावर जयकुमार गोरे हे ओबीसी नेतेसुद्धा होते, मग काल घेतलेला निर्णय सर्वमान्य होता तर हाच निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वी का घेतला नाही? दोन वर्षे मराठा आणि ओबीसी समाजात दरी निर्माण करण्यासाठी मुद्दामहून वाट पाहिली गेली का? या आंदोलनाचा इशारा तीन महिने आधी दिला असताना, तेंव्हाच सरकारने कार्यवाही का केली नाही? न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच मंत्रिमंडळ उपसमिती का सक्रीय झाली? मुंबईकरांची आणि आंदोलकांची गैरसोय झाली पाहिजे, ही सरकारचीच भूमिका होती का? असा सवाल रोहित पवार यांनी केला.

कालच्या GR बाबत तज्ज्ञांची मतं बघितली तर न्या. संदीप शिंदे समिती जे काम करत होती तेच काम जीआर मधून हैदराबाद गॅझेट या गोंडस नावाखाली होणार असल्याचं दिसून येतं. या जीआर संदर्भात अनेक शंका उपस्थित होत आहेत त्यावर सरकार उत्तर देणार आहे की नाही? या GR ची वैयक्तिक पातळीवरील दाखल्यासाठी वैधता प्रमाणपत्रांसाठी अंमलबजावणी झाल्यावरच खरं काय ते कळेल. पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवी मुंबईत मराठा आंदोलकांच्या हातावर तुरी दिल्या, तसंच आत्ताही जीआर मधील आश्वासनांची कालमर्यादा पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलकांची फसवणूक तर झाली नाही ना, हे देखील समोर यायला हवं? गेल्या वेळेस नवी मुंबईत झालेल्या फसवणुकीची पुनरावृत्ती होणार नाही ही सर्वसामान्य अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

एकंदर बघता, या सरकारने केवळ दोन समाजात वाद निर्माण करुन सत्तेची पोळी भाजली, हे स्पष्ट झालं आहे. सरकारने गावगाड्यातील ओबीसी-मराठा समाजात वाद लावल्याबद्दल जनतेची माफी मागायलाच हवी. ऐनकेन करून सामाजिक व धार्मिक ध्रुवीकरण करण्यापेक्षा यापुढे शेतकऱ्यांच्या, युवांच्या मध्यमवर्गीयासह जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर काम करणं अपेक्षित आहे. तूर्तास ‘दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही’ हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती असली तरी महाराष्ट्राला अशा चाणक्यनीतीची नाही तर माणुसकीच्या नीतीची आणि महाराष्ट्र धर्माची गरज आहे हे विसरता येणार नाही, असेही रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जगात कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही; शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा जगात कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही; शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाच्या 80 व्या वर्षानिमित्त चीनची राजधानी बीजिंगमध्ये भव्य लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले होते. चीन दरवर्षी 3...
अंबरनाथमध्ये केमिकल लोच्या.. 50 हजार नागरिकांचा जीव धोक्यात
अंबरनाथ, बदलापूरच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस, 190 जणांनी नोंदवला आक्षेप
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? संजय राऊत यांचा सवाल
दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका
मनोज जरांगे पाटील यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर त्यांचेही अभिनंदन – संजय राऊत
सौंदर्यासाठी गुलाबजल का आहे महत्त्वाचे?