तुमची गरज संपली… एआय करणार सगळी कामं; अमेरिकन कंपनीच्या सीईओची अजब घोषणा, एका फटक्यात 4 हजार कर्मचाऱ्यांना डच्चू

तुमची गरज संपली… एआय करणार सगळी कामं; अमेरिकन कंपनीच्या सीईओची अजब घोषणा, एका फटक्यात 4 हजार कर्मचाऱ्यांना डच्चू

एआय तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडवत आहे. एआयमुळे अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू झाली आहे. या यादीत आता अमेरिकन क्लाऊड सॉफ्टवेअरमधील दिग्गज कंपनी ‘सेल्सफोर्स’चे नाव आले आहे. ‘सेल्सफोर्स’ने 4 हजार नोकऱ्यांमध्ये कपात केली आहे. या नोकऱ्या कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिवच्या आहेत. त्यांचे काम आता ‘एआय’ करेल. मोठ्या प्रमाणात नोकरकपात केल्याची माहिती ‘सेल्सफोर्स’ कंपनीचे सीईओ मार्क बेनिओफ यांनी पॉडकास्टवरून दिली.

बेनिओफ म्हणाले, कंपनीने सपोर्ट टीममधील कर्मचाऱ्यांची संख्या 9 हजारने घटवून 5 हजार केली आहे. अशा तऱ्हेने कर्मचाऱ्यांची संख्या संतुलित करण्यात यश आले आहे. काही दिवसांपूर्वी याच सीईओ बेनिओफ यांनी उलट वक्तव्य केले होते. ‘एआयचा उद्देश कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणे नसून त्यांची संख्या वाढवणे आहे. माणसं कुठेही जात नाहीत,’ असे त्यांनी म्हटले होते.

  • सेल्फकोर्स कंपनीत एआयने केवळ सपोर्ट स्टाफमध्येच नव्हे तर सेल्सच्या सेक्टरमध्ये पाऊल टाकले आहे.
  • कंपनीची आता सॉफ्टवेअर इंजिनीयर तसेच वकिलांची नियुक्ती करण्याची कोणतीही योजना नाही. कंपनीने सारे लक्ष ग्राहकांनी एआय उत्पादने स्वीकारावी यावर केंद्रित केले.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे...
मनोज जरांगे पाटील यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर त्यांचेही अभिनंदन – संजय राऊत
सौंदर्यासाठी गुलाबजल का आहे महत्त्वाचे?
जगभरात टॅरिफ बॉम्ब फोडणाऱ्या ट्रम्प यांना झटका; अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा Moody’s चा दावा
जम्मू कश्मिरमध्ये पावसाचे थैमान, रेल्वेच्या 30 सप्टेंबरपर्यंत 68 गाड्या रद्द
सरकारनं दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग होणार नाही; नवीन काहीही मिळालेलं नाही! – मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील
हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 1337 मार्ग ठप्प