गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा मार्गावर लाकडी बोटी धक्क्याला? फायबर-स्टील बोटींसाठी सरकार आग्रही, बोट चालकांची 100 टक्के अनुदान देण्याची मागणी

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा मार्गावर लाकडी बोटी धक्क्याला? फायबर-स्टील बोटींसाठी सरकार आग्रही, बोट चालकांची 100 टक्के अनुदान देण्याची मागणी

गेट वे ऑफ इंडियापासून मांडवा आणि एलिफंटा बेटाच्या दरम्यान प्रवासी जलवाहतूक करणाऱया पारंपरिक लाकडी फेरी बोटी बदलून त्या ऐवजी आधुनिक फायबर आणि स्टीलच्या बोटींचा वापर करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने कृती आराखडा तयार केला आहे. पण या मार्गावरील पारंपरिक बोट  चालकांनी या योजनेला विरोध केला आहे. नव्या आधुनिक बोटींची खर्च परवडणार नाही. त्यामुळे 100 टक्के अनुदान देण्याची मागणी या बोटचालकांनी घेतली आहे.

गेल्या काही दिवसांत अलिबाग आणि आसपासच्या परिसरातील पर्यटन वाढले आहे. मोटारींसाठी रो-रो सेवा सुरू झाली आहे, पण तरीही गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेटीसाठी बहुतांश पर्यटक पारंपरिक लाकडी बोटींना प्राधान्य देतात कारण या बोट सेवेचे दर कमी आहेत. मात्र मागील काही काळात या मार्गावरील बोटींच्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने (बंदरे) गेट ऑफ इंडिया आणि इतर ठिकाणच्या पारंपरिक लाकडाच्या बोटी बदलण्याचे निर्देश जारी केले आहेत.

‘गेट वे’च्या समुद्रात 90 लाकडी बोटी

गेट वे ऑफ इंडिया येथे 90 पेक्षाही अधिक लाकडी बोटी आहेत. या बोटींचे रुपांतर नवीन बोटींमध्ये करणे किंवा नवीनच बोटी आणण्याबाबतचा महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचा कृती आराखडा राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. त्यानुसार गेट वे ऑफ इंडियाच्या जेटीवरील 90 पारंपरिक लाकडी बोटींचे आधुनिकीकरण करण्याची सरकारची योजना आहे.

प्रचंड आर्थिक भार

लाकडाच्या बोटींची किंमत सुमारे एक ते सवा कोटी रुपये आहे. पण नव्या बोटींसाठी पाच कोटी रुपयांचा खर्च आहे. हा खर्च आम्हाला परवडणार नाही. सरकारने आम्हाला 95 टक्के अनुदान देण्याची तयारी दर्शवली होती. उर्वरित रक्कम आम्हाला भरायला सांगितली होती. पण आम्हाला शंभर टक्के अनुदान हवे अशी भूमिका बोट चालकांनी घेतली आहे.

1 सप्टेंबरपासून फेरी बोटी पुन्हा सेवेत

तीन महिन्याच्या बंदी नंतर आता 1 सप्टेंबरपासून गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा फेरी बोटी पुन्हा सुरू होत आहेत. घारापुरी बेटाजवळ निघालेल्या बोटीच्या अपघातानंतर मेरिटाइम बोर्डाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक अटी घातल्या आहेत. या अटींची पूर्तता व दुरुस्ती केल्यानंतर फेरी बोटींना राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर न्यायालयात दाद मागणार – छगन भुजबळ ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर न्यायालयात दाद मागणार – छगन भुजबळ
मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात सरकारने जो शासन निर्णय जारी केला आहे. त्याबद्दल आणि त्या शासन निर्णयामध्ये लिहिलेल्या काही वाक्य,...
सरकारने पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची फसवणूक केली, काय म्हणाले अॅड. असीम सरोदे?
सोन्याला झळाळी, आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे!
Photo – ग्रीन साडीत अनन्याचा सोज्वळ लूक
Solapur News – सोलापूर-हैदराबाद महामार्गावर एसटी आणि ट्रकची धडक, 16 प्रवासी जखमी
Ratnagiri News – दुर्वास पाटील प्रकरणात जयगड पोलीस दोषी आढळल्यास कारवाई होणार, पोलीस अधीक्षकांचा इशारा
विधानसभेत मंजूर झालेलं विधेयक राज्यपाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू शकत नाहीत – सर्वोच्च न्यायालय