सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल खुला
सिंहगड रस्त्यावरील शिवा काशीद चौक ते हिंगणे दरम्यानचा स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अखेर उद्घाटन झाले. काम पूर्ण होऊनही मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन थांबवले होते. मुख्यमंत्री आले अन् फीत कापून गेले. उद्घाटनाच्या दिवशीदेखील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. पूर्वी राजाराम पूल ते फनटाइम थिएटर या 2.6 किमी अंतरावरील सहा चौक पार करण्यासाठी सुमारे 30 मिनिटांचा कालावधी लागत होता. नव्या उड्डाणपुलामुळे हा वेळ आता केवळ 5 ते 7 मिनिटांवर आला आहे. या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List