आदित्य ठाकरे यांची म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक, पागडीअंतर्गत येणाऱ्या मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत चर्चा

आदित्य ठाकरे यांची म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक, पागडीअंतर्गत येणाऱ्या मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत चर्चा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी म्हाडा चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एस जयस्वाल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पागडीअंतर्गत येणाऱ्या अत्यंत धोकादायक व जिर्णावस्थेतील इमारतींबाबत चर्चा केली. याबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

”आज आमदार अनिल परब आणि मी, पागडी एकता संघाच्या पदाधिकाऱ्यांसह म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एस जयस्वाल यांची पागडीअंतर्गत येणाऱ्या अत्यंत धोकादायक व जिर्णावस्थेतील इमारतींबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली. मुंबईत 13800 पेक्षा अधिक इमारतींमध्ये जवळपास 10 लाख कुटुंबं गेली 70 वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास आहेत. मविआ सरकारच्या काळात, भाडेकरूंना हक्क देणारे म्हणजेच मालकाने पुनर्विकासास नकार दिल्यास भाडेकरूंना तो करण्याचा अधिकार देणाऱ्या कायद्यात बदल करण्यात आले होते. मात्र, आता हे बदल ‘कायदेशीररित्या सक्षम प्राधिकरण/संस्था कोण?’ या कारणास्तव थांबविण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या गोष्टींवर आम्ही भर दिला: 1) भाडेकरूंना पुनर्विकासाचा अधिकार देणाऱ्या दुरुस्तीच्या न्यायालयीन प्रकरणांवर तातडीने निकाल देण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी. 2) 1965 पूर्वीच्या सर्व सेस इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्पष्ट निर्देश द्यावा, जो मालक किंवा भाडेकरूंना लागू होईल. या इमारतींपैकी बहुतांश अत्यंत जिर्णावस्थेत असून त्यात राहणे धोकादायक झाले आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;