शरीराचा हा भाग असतो सर्वात अस्वच्छ; आंघोळ केल्याने होत नाही साफ, असतात हजारो बॅक्टेरिया

शरीराचा हा भाग असतो सर्वात अस्वच्छ; आंघोळ केल्याने होत नाही साफ, असतात हजारो बॅक्टेरिया

आपलं शरीर स्वच्छ ठेवणं सर्वात महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी अनेकजण किती महागडे क्रिम, साबण, बॉडिवॉश वापरतात. आपलं शरीर कायम स्वच्छ राहावं आणि सुगंधी राहावं यासाठी आपण सगळेच प्रयत्न करत असतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दिवसातून कितीवेळा अंघोळ केली तरी देखील आपल्या शरीराचा एक भाग असा आहे जो अस्वच्छच राहतो. तो फक्त पाणी अंगावर पडल्याने स्वच्छ होत नाही. तोच भाग आपल्या शरीराचा सर्वात अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त भाग मानला जातो. तसेच बॅक्टेरिया देखील लवकर जमा होतात असं म्हटलं जातं. जरी तो स्वच्छ केला तरी तो नेहमीच पूर्णपणे स्वच्छ राहत नाही.

शरीराचा असा भाग जो कायम अस्वच्छ असतो 

आपल्या शरीराचा तो भाग म्हणजे नाभी. होय, आपण कोणत्याही साबणाने अंघोळ केली किंवा क्रिम लावली तरी देखील नाभी अस्वच्छच राहते. तसेच नाभीमध्ये सर्वात जास्त बॅक्टेरियांची संख्या असते असं म्हटलं जातं.

बॅक्टेरिया कायम असतात

2012 मध्ये PLOS One मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, नाभीमध्ये 2,368 प्रकारचे बॅक्टेरिया आढळले होते, त्यापैकी 1, 458 शास्त्रज्ञांसाठी नवीन होते. नाभी ही अशी जागा आहे जिथे खूप घाम येतो आणि ती उथळ असल्याने ती पूर्णपणे स्वच्छ करणे सोपे नाही. यामुळेच या भागाला दुर्गंधही येतो आणि बॅक्टेरिया वाढतात.

हा अवयव म्हणजे शरीराची जखम

विज्ञान म्हणते की नाभी ही शरीरावरची एक जखम आहे. जी बाळाच्या जन्मादरम्यान आईपासून वेगळी झाल्यावर तयार होते. ती बहुतेक आत असते आणि म्हणूनच ती स्वच्छ करणे कठीण असते. डीएलके कॉस्मेटिक डर्मेटोलॉजी अँड लेसर क्लिनिकमधील तज्ञांच्या मते, नाभी ही बॅक्टेरिया वाढण्यासाठी एक पोषक जागा आहे, विशेषतः जर तुमचे वजन जास्त असेल, त्यात टाइप 2 मधुमेह असेल किंवा नाभी छेदलेली असेल तर बॅक्टेरिया जास्त वाढतात.

नाभी स्वच्छ कशी करावी?

नाभी स्वच्छ ठेवण्यासाठी कोमट पाण्यात आणि साबणाच्या पाण्यात स्वच्छ कापड भिजवा आणि त्याने हळुवारपणे साफ करा. जास्त जोर लावून कधीहीनाभी साफ करू नका. जर तुम्हाला नाभीमध्ये खाज, लालसरपणा, वेदना किंवा जास्तच दुर्गंधी जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. संसर्ग वाढण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे, अन्यथा समस्या वाढू शकते.

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. यात आतापर्यंत 1 ते 3 या संवर्गातील 4...
शिर्डीत चार एकर जागेत मोफत पार्किंग, मंदिरालगतची गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडून सुविधा
‘कुणबी’साठी सांगली जिह्यात 14 लाख दस्तावेजांची तपासणी
कोल्हापुरात 21 तास विसर्जन सोहळा, 2700 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; मध्यरात्री साऊंड सिस्टीम बंद
अहिल्यानगरमध्ये 14 गणपतींची 12 तास मिरवणूक
इचलकरंजीत 26 तास मिरवणूक
साताऱ्यात 15 तास विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष