तीन बायका अन् जिवाला मुकला; फिल्मी स्टाईलने झाला खुनाचा उलगडा, जाणून घ्या नेमके काय घडले…
मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील गावात एका 60 वर्षीय वृद्धाचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्याला पोत्यात भरून विहिरीत टाकण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृताची ओळख भयालाल रजक अशी झाली आहे. भयालाल यांची तीन लग्न झाले होती. भयालाल यांची पहिली पत्नी त्यांना सोडून गेल्यानंतर, गुड्डीबाईंशी त्यांचे दुसरे लग्न झाले. मात्र तेही लग्न अयशस्वी झाले. कारण त्यांना मुले झाली नाहीत. म्हणूनच भयालाल यांनी गुड्डीबाईंची धाकटी बहीण मुन्नी उर्फ विमला रजक हिच्याशी तिसऱ्यांदा लग्न केले.
भयालालचे विमलाशी लग्न झाल्यानंतर, विमलाचे लल्लू कुशवाहा या प्रॉपर्टी डीलरशी अवैध संबंध बनले. लल्लू कुशवाहा वडिलोपार्जित जमिनीच्या व्यवहारांसाठी अनेकदा घरी येत असे. त्यामुळे या दोघांमधील संवाद वाढला. लल्लूवर प्रेम झाल्यानंतर, मुन्नीने (विमला) तिच्या पतीपासून सुटका मिळवण्यासाठी एक कट रचला.
मुन्नीने ३० ऑगस्ट रोजी, भयालाल त्याच्या घरी एकटाच झोपला असताना त्याला मारण्याचा प्रयत्न केला. यासाठी तिने लल्लू आणि त्याचा साथीदार धीरजला घरी बोलावले. त्या दोघांनी भयालाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले ज्यामुळे तो जागीच ठार झाला. त्यानंतर त्यांनी मृतदेह एका ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि पोत्यात भरला. यानंतर दोरीने आणि साड्यांनी बांधला आणि अनुपपूर जिल्ह्यातील घराच्या मागे असलेल्या शेतात असलेल्या विहिरीत फेकून दिला.
दरम्यान हा मृतदेह प्रथम भयालालच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला सापडला. तिला विहिरीत काहीतरी तरंगताना दिसले. त्यामुळे तिने तातडीने पोलिसात धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शोध सुरु केला. यावेळी हा मृतदेह भयालालचा असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात मुन्नी, तिचा प्रियकर लल्लू आणि त्याचा सहकारी धीरज यांचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List