दह्यात मीठ घालावं की साखर? काय फायदेशीर? 90 % लोकांना माहित नसेल
दही म्हटलं की अनेकांच्या आवडीता पदार्थ. जेवणातला आणि आरोग्याच्या बाबतला सर्वाच महत्त्वाचा भाग. अनेकांना तर रोजच्या जेवणात दही हे लागतच. मुख्य म्हणजे दही जेवणाची चव वाढवतं आणि दुसरं म्हणजे आणि पचन सुधारतं. अनेकजण दह्यात काही मिसळून खाण्याऐवजी असचं दही खातात,तर काहीजण दह्यात साखर किंवा मीठ मिसळून खातात. पण नक्की प्रश्न असा आहे की दह्यात मीठ घालावं की साखरं? कोणतं सर्वात जास्त फायदेशीर असतं जाणून घेऊयात.
दही खाण्याची योग्य पद्धत नक्की कोणती?
काही लोक दह्यात साखर घालून खातात, तर काही लोक चव वाढवण्यासाठी मीठ आणि कधीकधी जिरे पावडर किंवा सॅलडमध्ये दही घालून ते खातात. काही गावांमध्ये तर लोक वर्षभर मीठ घालून दही खाणे पसंत करतात, पण ही सवय आरोग्यासाठी चांगली आहे का? दही खाण्याची योग्य पद्धत नक्की कोणती आहे ते जाणून घेऊया.
साखरेसोबत दही खावे की मीठ खावे?
आहारतज्ज्ञांच्या मते साखरेसोबत दही खाणे अधिक फायदेशीर आहे. त्याचबरोबर, गुळासोबत दही खाणे हा देखील एक आरोग्यदायी पर्याय मानला जाऊ शकतो. दुसरीकडे, मीठ घालून दही खाणे टाळावे. जर तुम्हाला ते खायचेच असेल तर जेवताना चवीनुसार थोडे काळे मीठ किंवा खडा मीठ घालावं.
असं दही खाल्लं तर आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, दह्यात मीठ घालून ते जास्त काळ ठेवल्याने त्यात असलेल्या लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियाच्या पेशींवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे दह्याचे पोषक तत्वे कमी होतात. तसेच आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.
दुसरीकडे, संधिवात, दमा, सांधेदुखी, मूत्रपिंड आणि सर्दी असलेल्या रुग्णांनी तर दही खाऊच नये. पावसाळ्यात पचनसंस्था कमकुवत होते, म्हणून दही खाणे टाळावं किंवा ते मर्यादित प्रमाणात मर्यादित खावं.
दही खाण्याची उत्तम वेळ
तसेच, दही खाण्याची उत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणात. रात्री कधीही दही खाऊ नये. कारण रात्री दही खाल्ल्याने गॅस, पोटफुगी आणि जडपणा येऊ शकतो. योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात दही खाल्ले शरीरासाठी फायदेशीर असते. आणि जरी रात्रीच्या जेवणात दही खायचेच असेल तर ते नुसतेच खाण्यापेक्षा सॅलेडमध्ये थोडेसे घालून खाऊ शकता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List