उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, ‘इंडिया’च्या खासदारांचे आज ‘मॉक पोल’

उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, ‘इंडिया’च्या खासदारांचे आज ‘मॉक पोल’

जगदीप धनखड यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी इंडिया आघाडीच्या खासदारांची महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत खासदारांचे ‘मॉक पोल’ (अभिरूप मतदान) घेण्यात येणार आहे.

‘इंडिया’च्या खासदारांची बैठक संविधान सदनमधील सेंट्रल हॉलमध्ये दुपारी अडीच वाजता होईल. या बैठकीत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया खासदारांना समजावली जाणार आहे. तसेच याचवेळी अभिरूप मतदानही घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर रात्री 7.30 वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडी व एनडीएमध्ये कडवी टक्कर होणार आहे. इंडिया आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांच्या रूपाने तगडा उमेदवार मैदानात उतरला आहे. सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन दक्षिणेतील खासदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा भाजपचा प्लानही फसला आहे. सुदर्शन रेड्डी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या आधी देशभरातील खासदारांच्या गाठीभेटी घेऊन आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. त्यातच खुद्द भाजप व एनडीएमध्ये अंतर्गत धुसफुस आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंदुस्थानचा आत्मा टिकवण्यासाठी मतदान करा रेड्डी

मला होणारे मतदान हे कुणा एका व्यक्तीला नसेल, तर हिंदुस्थानचा आत्मा टिकवण्यासाठी आहे. लोकशाही ही वादातून नव्हे, तर सहकार्यातून समृद्ध होते. दुसऱ्याचे ऐकून घेण्यावर, परस्पर सामंजस्य आणि समन्वयातून एकमत घडवून आणण्यावर माझा विश्वास आहे. या निवडणुकीत पक्षाचा व्हीप लागू होत नाही. याचाच अर्थ पक्ष कोणत्याही सदस्याला कोणतेही बंधन घालू शकत नाही. तेव्हा देशप्रेम हाच तुमच्या निवडीचा निकष असला पाहिजे, असे आवाहन सुदर्शन रेड्डी यांनी खासदारांना केले.

एनडीएच्या कार्यशाळेत मोदी शेवटच्या रांगेत!

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएने दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा रविवारपासून सुरू झाली. पंतप्रधान मोदीही त्यात सहभागी झाले होते. मोदी हे यावेळी एनडीएच्या अन्य खासदारांसारखे वावरत होते. ते शेवटच्या रांगेत बसले होते. त्यांचा हा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दोन दिवसांच्या या कार्यशाळेत वेगवेगळी सत्रे होणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. यात आतापर्यंत 1 ते 3 या संवर्गातील 4...
शिर्डीत चार एकर जागेत मोफत पार्किंग, मंदिरालगतची गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडून सुविधा
‘कुणबी’साठी सांगली जिह्यात 14 लाख दस्तावेजांची तपासणी
कोल्हापुरात 21 तास विसर्जन सोहळा, 2700 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; मध्यरात्री साऊंड सिस्टीम बंद
अहिल्यानगरमध्ये 14 गणपतींची 12 तास मिरवणूक
इचलकरंजीत 26 तास मिरवणूक
साताऱ्यात 15 तास विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष