देवाभाऊंच्या जाहिरातीसाठी दररोज 50 कोटी खर्च करणारा बेनामी दानशूर कोण? संजय राऊत यांचा परखड सवाल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या झळकलेल्या जाहिरातीबाबत प्रश्न करत एवढे खर्च करणारा बेनामी दाता कोणे, असा सवाल केला आहे. तसेच जाहिरातीवर एवढा खर्च केल्यामुळे कोणाला काय फायदा झाला आहे, असा सवालही त्यांनी केला. गेल्या काही काळात भादपकडून फक्त नैतिकतेच्या फक्त गप्पा मारण्यात येतात. मात्र, त्याचे पालन करण्यात येत नाही, असा घणा
काही ठिकाणी दर्शनाला प्रंचड गर्दी असते. अशा गर्दीत आणखी एकाची भर नको, म्हणून आपण अशा ठिकाणी जात नाही. जनतेनेही हे समजून घेतले पाहिजे. आपली श्रद्धा असली तरी घरातील, कोणत्याही मंडळातील, मंदिरातील गणपती एकच आहे. लालबागचा राजा अमिश शहा यांना जास्त पावतो, तो मराठी माणसाला पावत नाही, असे दिसते. तो जेव्हा मराठी माणसाला पावेल, असे जेव्हा होईल, तेव्हा आपण या गणपतीच्या दर्शनाला जाऊ असे ते म्हणाले.
फडणवीस यांच्या ज्या जाहिराती राज्यात झळकत आहेत, त्यावर 50 कोटींचा खर्चा अज्ञाताने केला आहे, तो अज्ञात दाता कोण, हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती असायला हवे. संपूर्ण राज्यभरात लागलेले होर्डिंग्ज, सर्व भाषेच्या वृत्तपत्रात देण्यात आलेल्या जाहिराती, टीव्हीवरील जाहिराती या सर्वांचा एका दिवसाचा खर्च साधारण 50 कोटी असतो. या जाहिराती सातत्याने लागत आहे. त्यामुळे देवाभाऊंसाठी दररोज 50 कोटी खर्च करणारा दाता कोण, त्याचा त्याला भाजप आणि सरकारकडून काय लाभ झाला, असा प्रश्न राज्याला पडला आहे.
फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांना आचारसंहिता आणि नैतिकता असते. याआधीच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी त्याचे पालन केले आहे. त्यांनी पै-पैचा हिशोब जनतेला दिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात ही प्रथा बंद पडली आहे. फक्त नैतिकतेच्या गप्पा हे सर्व मारतात. मात्र, त्यांच्या काळात दररोज नैतिकतेचे अधःपतन होत असल्याचे दिसून येते. अशा जाहिराती कुख्यात गुंड, कुप्रसिद्ध बिल्डर अशा जाहिराती देतात. असा पैसा त्यांचाच असतो. त्यामुळे त्यांनी जाहिरतीखाली नाव देणे टाळले आहे. बनामी पैसा असलेल्यांनी अशी जाहिराती दिली असावी. बेनामी संपत्ती असलेल्यांचा पक्ष आहे, हे जनतेलाही माहिती आहे. त्यामुळे असे बेनामी उद्योग ते करतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List