Ganpati Visarjan गणपती गेले गावाला… मुंबईच्या रस्त्यांवर आला भक्तीचा पूर

Ganpati Visarjan गणपती गेले गावाला… मुंबईच्या रस्त्यांवर आला भक्तीचा पूर

ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्ये, सनईंचे एक सूर अशा उत्साही, उत्सवी वातावरणात मुंबईकरांनी अकरा दिवसांच्या गणरायाला शनिवारी भक्तिभावाने निरोप दिला. शहर आणि उपनगरांतील 36 हजारांहून अधिक गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात सार्वजनिक मंडळांच्या 5 हजार 937 तसेच 30 हजार 490 घरगुती गणपतींचा समावेश होता. मुसळधार पावसातही विसर्जन मिरवणुकीत लाखो गणेशभक्तांचा प्रचंड जल्लोष होता. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत मुंबईकरांनी बाप्पाला निरोप दिला.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण मानल्या जाणाऱया गणेशोत्सवावर यंदा राज्य सरकारने अनेक निर्बंध लादले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपासून ते डीजेच्या वापरावर सरकारने वक्रदृष्टी रोखली. या निर्बंधांनंतरही गणेशभक्तांच्या उत्साहाला पारावार उरला नव्हता. संपूर्ण मुंबई शहरासह राज्यभरात गणपती विसर्जनाचा प्रचंड उत्साह दिसला. ’गणेशोत्सवाची पंढरी’ असलेल्या दक्षिण मुंबईतील लालबाग, परळ परिसर शनिवारी सकाळपासून भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. बाप्पाची विधिवत पूजा आणि आरती करून अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील सर्व रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुकांची धूम होती. गिरगाव चौपाटीसह दादर, जुहू, वर्सोवा, वांद्रे, गोराई चौपाटीवर सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. तसेच जागोजागी व्यवस्था केलेल्या पृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणरायांचे विसर्जन करण्यात आले.

पालिकेच्या आकडेवारीनुसार, अकराव्या दिवशी सार्वजनिक – 5 हजार 937, घरगुती – 30 हजार 490, हरतालिका आणि गौरी- 319 अशा प्रकारे एपूण 36 हजार 746 गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यंदा संपूर्ण गणेशोत्सवात 1 लाख 97 हजार 114 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये 1 लाख 81 हजार 375 घरगुती तर 10 हजार 148 सार्वजनिक मंडळांचे गणपती तसेच गौरी व हरतालिका मिळून 5 हजार 591 मूर्ती समाविष्ट आहेत.

508 मेट्रिक टन निर्माल्य केले गोळा

गणेशोत्सवात निर्माल्यांचे संकलन करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेष प्रयत्न केले. सार्वजनिक मंडळांकडून योग्य प्रकारे निर्माल्य संकलित केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. मुंबईतील विविध विसर्जनस्थळी एकूण 594 निर्माल्य कलश आणि 307 निर्माल्य वाहनांची व्यवस्था केली होती. त्याद्वारे एकूण 508 मेट्रिक टन निर्माल्य संकलित केल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱयांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. यात आतापर्यंत 1 ते 3 या संवर्गातील 4...
शिर्डीत चार एकर जागेत मोफत पार्किंग, मंदिरालगतची गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडून सुविधा
‘कुणबी’साठी सांगली जिह्यात 14 लाख दस्तावेजांची तपासणी
कोल्हापुरात 21 तास विसर्जन सोहळा, 2700 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; मध्यरात्री साऊंड सिस्टीम बंद
अहिल्यानगरमध्ये 14 गणपतींची 12 तास मिरवणूक
इचलकरंजीत 26 तास मिरवणूक
साताऱ्यात 15 तास विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष