देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्या
पाकिस्तानला पुराचा फटका, लाखो विस्थापित
पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत 907 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1044 जण जखमी झाले. पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शनिवारी याबाबतची माहिती दिली. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात सुमारे 42 लाख पुरामुळे प्रभावित झाले आहेत. रावी, सतलज आणि चिनाब नदी किनाऱयावरील 4100 पेक्षा अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत. येथील लाखो लोकांचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे.
ओडिशामध्ये वीज कोसळून भाविक जखमी
ओडिशामध्ये देवगड जिह्यातील रियामल ब्लॉकच्या राजचट गावात वीज कोसळून एका पूजेसाठी जमलेल्यांपैकी 50 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. गिरी गोवर्धन पूजेसाठी गावकरी एकत्र आले होते. या जखमींपैकी 12 जणांना छेंडीपाडा सामुदायिक आरोग्य पेंद्रात दाखल करण्यात आले आहे, तर गंभीर असलेल्या तीन जणांवर कोसला सामुदायिक आरोग्य पेंद्रात उपचार सुरू आहेत.
थायलंडमध्ये नव्या पंतप्रधानांना शाही मान्यता
अनुतिन चार्नविराकुल यांना रविवारी थायलंडचे नवे पंतप्रधान म्हणून शाही मान्यता मिळाली. दोन दिवसांपूर्वी अनुतिन चार्नविराकुल यांची संसदेने बहुमताने थायलंडचे नवे पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. अनुतिन हे भूमजैथाई राजकीय पक्षाचे नेते आहेत. ते पैथोंगटार्न शिनावात्रा सरकारमध्ये मंत्रीदेखील होते. जुलै 2025 मध्ये पायतोंगथॉर्न यांचे माजी पंबोडियन नेते हुन सेन यांच्याशी पह्नवरून झालेले संभाषण लीक झाले. ज्या वेळी हा पह्न करण्यात आला, त्या वेळी थायलंड आणि शेजारील पंबोडियामध्ये प्राचीन शिव मंदिरांवरून संघर्ष सुरू होता. विरोधकांनी हा मुद्दा पेटवल्यावर माजी पंतप्रधान पायतोंगटार्न यांना पदावरून हटवण्यात आले.
शरजील इमामची सुप्रीम कोर्टात धाव
राजधानी दिल्ली येथे 2020 साली झालेल्या दंगलीप्रकरणी आरोपी शरजील इमाम याचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दंगलीप्रकरणी इमाम याला 28 जानेवारी 2020 रोजी अटक करण्यात आली होती. दिल्ली हायकोर्टाने इमामचा जामीन फेटाळताना म्हटले की, संपूर्ण कटात इमाम आणि अन्य आरोपी उमर खालीद यांची भूमिका गंभीर होती. त्यांनी मुस्लिम समुदायाच्या लोकांना मोठय़ा प्रमाणात एकत्र आणण्यासाठी प्रक्षोभक भाषणे केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List