मुंबईला जाण्यासाठी गणेशभक्तांची रेल्वे स्थानकांवर गर्दी
अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करून रात्रीपासूनच गणेशभक्त, चाकरमान्यांनी मुंबईकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाडय़ांसाठी सावंतवाडीसह विविध रेल्वे स्थानकांवर गर्दी केली होती. त्यामुळे रेल्वे स्थानके भरून गेली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बाप्पाची सेवा केल्याचा आनंद दिसत होता.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात आलेल्या मुंबईकर गणेशभक्तांनी, चाकरमान्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या घरगुती तसेच मोठ्या मंडळांच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर शनिवारपासून मुंबईला परतू लागले आहेत. ’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ असा जयघोष करत भक्तिमय वातावरणात गणपतीचे विसर्जन करून त्यांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा करणाऱया कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी विशेष गाडय़ा सुरू केल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List