टाइम्स स्क्वेअरवर झळकला ‘दशावतार’, दिमाखदार टीझरने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले

टाइम्स स्क्वेअरवर झळकला ‘दशावतार’, दिमाखदार टीझरने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले

मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेला ‘दशावतार’ चित्रपट महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता आता जागतिक स्तरावरही गाजू लागला आहे. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकलेल्या या चित्रपटाच्या दिमाखदार टीझरमुळे या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष वेधून घेतले आहे. मराठी सिनेसृष्टीसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला असून मराठी चित्रपटाचा डंका ‘टाइम्स स्क्वेअर’वर वाजण्याची ही पहिलीच वेळ आहे.

महाराष्ट्रातील रूढी, परंपरा, संस्कृती, दमदार कथा आणि आधुनिक सिनेतंत्रातून निर्माण झालेली भव्यता यांचा संगम असलेल्या या चित्रपटामुळे मराठी चित्रपट जागतिक स्तरापर्यंतही झेप घेऊ शकतो याची जाणीव यानिमित्ताने झाली आहे. याबाबत दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, “दशावतार ही महाराष्ट्राच्या मातीतली गोष्ट असली तरी त्याचा विषय, त्यातली पात्रे आणि दिसणारा निसर्ग हा वैश्विक स्तरावर सहज आपलासा वाटणारा आहे व त्यातच टाइम्स स्क्वेअरवर टीझर प्रदर्शित होणे ही आमच्या मेहनतीला मिळालेली आंतरराष्ट्रीय दाद आहे. आपल्या मराठीचा डंका सातासमुद्रापार वाजतोय याचा मराठी माणूस म्हणून अभिमान आहे.’’ झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 12 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. यात आतापर्यंत 1 ते 3 या संवर्गातील 4...
शिर्डीत चार एकर जागेत मोफत पार्किंग, मंदिरालगतची गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडून सुविधा
‘कुणबी’साठी सांगली जिह्यात 14 लाख दस्तावेजांची तपासणी
कोल्हापुरात 21 तास विसर्जन सोहळा, 2700 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; मध्यरात्री साऊंड सिस्टीम बंद
अहिल्यानगरमध्ये 14 गणपतींची 12 तास मिरवणूक
इचलकरंजीत 26 तास मिरवणूक
साताऱ्यात 15 तास विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष