नवीन उपराष्ट्रपतींनी सावध रहावे, कारण…; संजय राऊत यांचा महत्त्वाचा सल्ला

नवीन उपराष्ट्रपतींनी सावध रहावे, कारण…; संजय राऊत यांचा महत्त्वाचा सल्ला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीबाबत माहिती दिली. तसेच नवीन उपराष्ट्रपतींनी काळजी घेण्याची गरज आहे, कारण आधीचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचे नेमके काय झाले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही, असे सांगत त्यांनी महत्त्वाचा दावाही केला आहे.

पंचाग पाहणे, मुहूर्त पाहणे तिथी पाहणे हे सर्व भाजपकडून सुरू असते. मात्र, गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच भाजपने स्वतःला सेक्युलर घोषित केल्यासारखे वाटत आहे. पितृपक्षाच्या पहिल्या दोन दिवसातच उपराष्ट्रपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे नवीन निवडून येणाऱ्या उपराष्ट्रपतींनी सावध राहण्याची गरज आहे. कारण आधीच्या उपराष्ट्रपतींचे नेमके काय झाले, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे जगदीप धनकड यांचे सार्वजनिक ठिकाणी दर्शन होत नाही, तोपर्यंत ते गायब आहे, असे मानले जाईल, तसेच त्यांच्याबाबतच्या शंका कायम राहतील. त्यामुळे नव्याने येणाऱ्या उपराष्ट्रपतींनी आधीच्या उपराष्ट्रपतींनी नेमक्या काय चुका केल्या, हे समजून काम करावे लागणार आहे. तसेच हे होऊ द्यायचे नसेल तर खासदारांनी राष्ट्रहिताचा विचार करत बी. सुदर्शन रेड्डी यांना मतदान करावे, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.

जगदीप धनकड यांनी कणा असल्याचे दाखवल्यानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. राजीनामा वैगरे थोतांड आहे, त्यांना गायब करण्यात आले. आता त्यांचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवारही त्याच पठडीतले आहेत. त्यामुळे देश वाचवायचा असेल, लोकशाही टिकवायची असेल, तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी हे योग्य उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इंडिया आघाडीचे सर्व खासदार दुपारी एकत्र येणार आहे. उद्याच्या निवडणुकीबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे प्रक्रिया थोडी किचकट असल्याने त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भाजपडून निवडणुकांमध्ये यंत्रणांचा गैरवापर करणे, धमकावणे अशा गोष्टी होत असतात. मात्र, आता त्यांना असे करणे शक्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्यातील काही लोक प्रलोभनांना बळी पडून किंवा कारवाईच्या भीतीने दुसरीकडे गेले आहेत. मात्र, मुंबई, ठाणे यासारख्या महापालिकेच्या निवडणुका शिवसेनाच (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिंकणार, याबाबत आमच्या मनात काहीही शंका नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Explainer : केमोथेरपीच्या वेदनेतून सुटका होणार ? नवी कॅन्सर लस किती प्रभावी ठरणार ? Explainer : केमोथेरपीच्या वेदनेतून सुटका होणार ? नवी कॅन्सर लस किती प्रभावी ठरणार ?
जगभरात वेगाने पसरणाऱ्या कॅन्सर आजारा संदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियाच्या संशोधकांनी आता कॅन्सरची व्हॅक्सीन ( Cancer Vaccine...
तिसऱ्या पत्नीसोबत कडाक्याचे भांडण, खून करून उचलले धक्कादायक पाऊल
आधारकार्ड ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारावाच लागेल! SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे ECI ला महत्त्वाचे आदेश
थुलथुलीत झालेले पोट कमी करण्यासाठी या भाज्या खायलाच हव्यात, वाचा
बलात्काराच्या आरोपीला 25 लाख रुपये नुकसान भरपाई, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कायद्याने घेतला महिलांचा बळी; अफगाणिस्तानातील भूकंपात पुरुषच का बचावले? जाणून घ्या कारण…
तुम्ही थेट गॅसवर चपाती भाजताय का?