तुरुंगात प्रज्वल रेवण्णाची ड्युटी लायब्ररीत
बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा प्रज्वल रेवण्णा तुरुंगातील लायब्ररीत काम करत आहे. परप्पना अग्रहारा सेंट्रल जेल प्रशासनाने रेवण्णाची डय़ुटी लायब्ररीत लावली आहे. या कामाचे त्याला दिवसाला 522 रुपये मिळतील. पैद्यांना पुस्तके देणे तसेच त्याची नोंद ठेवणे ही कामे तो करत आहे. हे काम योग्य पद्धतीने केले तरच रेवण्णाला पैसे मिळतील, असे जेल प्रशासनाने सांगितले. बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने 2 ऑगस्ट रोजी रेवण्णाला मोलकरणीवर बलात्कार केल्याच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List