टॅरिफ टाळण्यासाठी ट्रम्पशी केलेली डील मुळावर! जपानचे पंतप्रधान इशिबा यांचा राजीनामा

टॅरिफ टाळण्यासाठी ट्रम्पशी केलेली डील मुळावर! जपानचे पंतप्रधान इशिबा यांचा राजीनामा

टॅरिफ कमी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केलेली ट्रेड डील जपानी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या अंगाशी आली आहे. अवघ्या 11 महिन्यांत इशिबा यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पक्षाचा लागोपाठ झालेला पराभव हेही त्यांच्या राजीनाम्याचे कारण ठरले आहे.

इशिबा हे जपानी राजकारणावर अनेक दशकांपासून पकड असलेल्या लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसेच देशाचे पंतप्रधानपदही त्यांच्याकडे होते. ट्रम्प यांनी टॅरिफचा धडाका लावल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी इशिबा यांनी अमेरिकेशी  व्यापार करार केला. टॅरिफ कमी करण्याच्या बदल्यात इशिबा यांनी अमेरिकेत 550 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे मान्य केले. या कराराचा जपानच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. देशाच्या ऑटोमोबाइल उद्योगाची आर्थिक वाढ मंदावली. इशिबांच्या या निर्णयामुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आणि त्याचा परिणाम पुढील निवडणुकांमध्ये दिसला.

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत एलडीपीला कनिष्ठ सभागृहात बहुमत गमवावे लागले होते. या वर्षी वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे पक्षात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. पक्ष फुटीच्या उंबरठय़ापर्यंत आला होता. इशिबा यांची हकालपट्टी करण्याची रणनीती पक्षांतर्गत विरोधकांनी आखली होती. तत्पूर्वीच, त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.

बहुमत नसूनही पंतप्रधानपदाला चिकटून होते!

दोन्ही सभागृहात बहुमत गमावूनही इशिबा पंतप्रधानपदी होते. त्यांच्या पक्षाच्या जागा घटल्या असल्या तरी दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे सरकार स्थापन करण्याइतके संख्याबळ नव्हते. त्याचा फायदा इशिबा यांनी उठवला. छोटय़ा छोटय़ा पक्षांचा पाठिंबा घेऊन ते सरकार चालवत होते. मात्र पक्षातूनच विरोध तीव्र झाल्याने त्यांना शस्त्र टाकावी लागली.

आठ दिवसांपूर्वीच मोदींसोबत बुलेट सफर

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचा दौरा केला होता. त्यावेळी इशिबा यांच्यासोबत त्यांनी द्विपक्षीय सहकार्याची चर्चाही केली होती. तसेच, दोन्ही नेत्यांनी बुलेटची सफरही केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. यात आतापर्यंत 1 ते 3 या संवर्गातील 4...
शिर्डीत चार एकर जागेत मोफत पार्किंग, मंदिरालगतची गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडून सुविधा
‘कुणबी’साठी सांगली जिह्यात 14 लाख दस्तावेजांची तपासणी
कोल्हापुरात 21 तास विसर्जन सोहळा, 2700 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; मध्यरात्री साऊंड सिस्टीम बंद
अहिल्यानगरमध्ये 14 गणपतींची 12 तास मिरवणूक
इचलकरंजीत 26 तास मिरवणूक
साताऱ्यात 15 तास विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष