गुन्हे वृत्त – 72 लाखांचे दागिने चोरी प्रकरणी नोकराला अटक

गुन्हे वृत्त – 72 लाखांचे दागिने चोरी प्रकरणी नोकराला अटक

72 लाखांचे दागिने चोरी प्रकरणी एकाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. करणसिंह खारवार असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चोरीनंतर करणसिंह हा राजस्थान येथे पळून जाणार होता. त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

शहरात गणेशोत्सवादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱयांना मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. वरिष्ठ निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक धीरज वायकोस, अनिकेत शिंदे आदींचे पथक शनिवारी बोरिवली पूर्व परिसरात गस्त करत होते, तेव्हा एक जण संशयास्पद फिरताना दिसला. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली. त्यात 78 तोळे सोने आणि 1 लाख 39 हजार रुपये पॅश मिळून आले. पैसे, दागिनेबाबत त्याच्याकडे चौकशी केली.

करणसिंह हा नवी मुंबईतील एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करतो. त्याने त्या दुकानातून दागिने चोरल्याचे पोलिसांना सांगितले. चोरी केल्यानंतर तो गावी जाण्यासाठी बोरिवली येथे आला. त्याला पुढील तपासासाठी कामोठे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

वाहन अपघातात दोघांचा मृत्यू 

लालबाग आणि शिवडी येथे झालेल्या वाहन अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. चंदा वजनदार आणि विघ्नेशकुमार पोपलकर अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी काळाचौकी आणि शिवडी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

सुमन वजनदार या लालबाग परिसरात राहतात. तिला शैलेश आणि चंदा अशी दोन मुले आहेत. शुक्रवारी रात्री सुमन ही लालबाग येथील डॉ. एस बी रोड येथून दादरच्या दिशेने जाणाया रस्त्यावर सफाईचे काम करत होती. तिचे दोन्ही मुले लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर झोपली होती. तेव्हा भरधाव वेगातील जाणाया वाहनाने त्या दोन्ही मुलाला जोरात धडक दिली. त्यात ते दोन्ही मुले जखमी झाले. जखमी झालेल्याला मुलाना उपचारासाठी केईम रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी चंदाला तपासून मृत घोषित केले. तर शैलेशवर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत.

तर दुसरी घटना शिवडी परिसरात घडली. राज आणि विघ्नेश्वर हे दोघे अंधेरी परिसरात राहतात. शुक्रवारी पहाटे ते दोघे गणपती दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते दोघे मोटारसायकलवरून घरी जात होते. ईस्टर्न फ्री वे खालील उत्तर वाहिनीवरून जात असताना अचानक डंपरने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली. त्या धडकेत ते दोघे जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच शिवडी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या दोघांना केईम रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी विघ्नेश्वरला तपासून मृत घोषित केले. अपघात प्रकरणी डंपर चालक करणकुमार पालला शिवडी पोलिसांनी अटक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. यात आतापर्यंत 1 ते 3 या संवर्गातील 4...
शिर्डीत चार एकर जागेत मोफत पार्किंग, मंदिरालगतची गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडून सुविधा
‘कुणबी’साठी सांगली जिह्यात 14 लाख दस्तावेजांची तपासणी
कोल्हापुरात 21 तास विसर्जन सोहळा, 2700 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; मध्यरात्री साऊंड सिस्टीम बंद
अहिल्यानगरमध्ये 14 गणपतींची 12 तास मिरवणूक
इचलकरंजीत 26 तास मिरवणूक
साताऱ्यात 15 तास विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष