कोकणात बाप्पाला वाजतगाजत निरोप
ढोलताशांचा गजर… फटाक्यांची आतषबाजी…लेझीमच्या तालावर नाचत गणेशभक्तांनी अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाला निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला या जयघोषाने मांडवी परिसर दुमदुमून गेला होता.
जिह्यात 36 हजार 405 घरगुती गणेशमूर्ती आणि 65 सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. 27 ऑगस्टला गणपती बाप्पांचे वाजत गाजत आगमन झाले. रत्नागिरी जिह्यात 1 लाख 69 हजार 426 घरगुती आणि 126 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. दरम्यान, सिंधुदुर्गातही हजारो घरगुती तसेच काही सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे मोठय़ा उत्साहाने विसर्जन करण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List