पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती गुंड आणि भ्रष्टाचारी यांच्या विळख्यात अडकली, रोहित पवार यांचा आंदोलनाचा इशारा

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती गुंड आणि भ्रष्टाचारी यांच्या विळख्यात अडकली, रोहित पवार यांचा आंदोलनाचा इशारा

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती गुंड आणि भ्रष्टाचारी यांच्या विळख्यात अडकली, रोहित पवार यांचा आंदोलनाचा इशारा

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही गुंड आणि भ्रष्टाचारी यांच्या विळख्यात अडकली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच याबाबात कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांसोबत आंदोलन करणार असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही गुंड आणि भ्रष्टाचारी यांच्या विळख्यात अडकली असून अधिकारी आणि सदस्य यांच्या संगनमताने इथं सुमारे 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाऱ्यांना मा. अजितदादा यांचा वरदहस्त असल्याचं तेच सांगत असल्याने अजितदादांनीही याबाबत खुलासा करण्याची गरज आहे. याबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी प्रवक्ते विकास लवांडे हे उपस्थित होते.

श्री. विकास लवांडे हे गेल्या अनेक दिवसांपासून या भ्रष्टाचारावर आवाज उठवत आहेत. बेकायदा भाडे वसुली (जी 56 गैरव्यवहार), 4 हजार लोकांना अनधिकृत परवाना, अनधिकृतपणे बाजार समितीच्या जागा भाड्याने देणे, रोजंदारी सेवकांच्या कायम नियुक्तीत भ्रष्टाचार, गाळ्यांचे अनधिकृत वाटप, शेतकऱ्यांसाठी असलेली स्वच्छतागृहे बंद करुन त्या जागा अनधिकृतपणे सलून किंवा गुटखा विक्रीसाठी देणं, संचालकांकडूनच पार्कींगच्या नावाखाली केली जाणारी लूट, सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीत भ्रष्टाचार, गुंडांचा सर्रास वापर, यातून व्यापाऱ्यांना होणारा त्रास, स्वच्छता कंत्राटात गैरव्यवहार असे अनेक प्रकारचे गैरव्यवहार या बाजार समितीत सर्रासपणे सुरु आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी डीडीआर जगताप यांची नेमणूक केली असली तरी तेच गैरव्यवहारात अडकले आहेत. गैरव्यवहाराच्या या प्रकरणाची चौकशी करण्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला असतानाही पणन संचालकांकडून पारदर्शकपणे चौकशी होत नाही.

कळस म्हणजे गैरव्यवहारावर पांघरून घातलं जावं म्हणून अधिकारी आणि मंत्र्यांपर्यंत हप्ते जातात अशी चर्चा आहे. त्यामुळं पुढच्या १५ दिवसांत सरकारकडून याविरोधात कारवाई झाली पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांसोबत मोठं आंदोलन केलं जाईल, याची सरकारने नोंद घ्यावी असेही रोहित पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – मिरकरवाडा येथील समुद्रात बेपत्ता झालेल्या दोन खलांशांपैकी एकाचा मृतदेह सापडला Ratnagiri News – मिरकरवाडा येथील समुद्रात बेपत्ता झालेल्या दोन खलांशांपैकी एकाचा मृतदेह सापडला
मासेमारी करून परत मिरकरवाडा बंदरात येणारी ‘अमीन आएशा’ ही मच्छिमार नौका बुडाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या नौकेवर एकूण आठ...
अजित पवारांच्या नावाखाली पुणे बाजार समितीत 200 कोटींचा घोटाळा, आमदार रोहित पवार यांचा आरोप
Ratnagiri News – तिहेरी हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा, शिवसेनेची मागणी
इस्रायलमध्ये बस स्टॉपवर अंधाधुंद गोळीबार, 5 जण ठार; 15 जण जखमी
Explainer : केमोथेरपीच्या वेदनेतून सुटका होणार ? नवी कॅन्सर लस किती प्रभावी ठरणार ?
तिसऱ्या पत्नीसोबत कडाक्याचे भांडण, खून करून उचलले धक्कादायक पाऊल
आधारकार्ड ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारावाच लागेल! SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे ECI ला महत्त्वाचे आदेश