मिरकरवाडा बंदराजवळ ‘अमीन-आएशा’ मच्छीमार नौका समुद्रात बुडाली; दोन खलाशी बेपत्ता

मिरकरवाडा बंदराजवळ ‘अमीन-आएशा’ मच्छीमार नौका समुद्रात बुडाली; दोन खलाशी बेपत्ता

मासेमारी करून परत मिरकरवाडा बंदरात येणारी ‘अमीन आएशा’ ही मच्छिमार नौका बुडाल्याची घटना घडली आहे. या नौकेवर आठ खलाशी होते. सहा जणांनी पोहत किनारा गाठण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुसरी स्थानिक मच्छिमार नौका मदतीला धावून आल्याने सहा खलाशी वाचले आहेत. दोन खलाशी अद्याप बेपत्ता आहेत.

अमीन आएशा ही मासेमारी करणाऱ्यासाठी गेलेली नौका परतीच्या प्रवासात बुडाली. नौका बुडत असल्याचे समजताच खलाशांनी समुद्राच्या पाण्यात उड्या टाकल्या. सुमारे तासभर समुद्रात पोहत ते खलाशी प्राण वाचवण्यासाठी धडपडत असताना दुसऱ्या एका स्थानिक मच्छिमार नौकेने सहा खलाशांना वाचवले.दोन खलाशी अद्याप बेपत्ता आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;