साऊथ अभिनेत्री नव्या नायरला चमेलीचा एक गजरा पडला सव्वा लाखाला; वाचा नेमकं काय घडलं?
पारंपारिक साज-श्रुंगार हा गजऱ्याशिवाय अपुर्ण आहे. मात्र याच गजऱ्यामुळे प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री संकटात आली आहे. तिला ऑस्ट्रेलिया विमानतळावर तब्बल 1.14 लाखांचा दंड भरावा लागला आहे.
प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री नव्या नायर विक्टोरया मलयाली असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या ओनम सेलिब्रेशन साठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. तिथे ओनमच्या मंचावर नव्याने तिच्यासोबत झालेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. तिने सांगितले, कोची ते सिंगापुर प्रवासावेळी तिच्या वडिलांनी एक चमेलीचा गजरा खरेदी केला. तिने त्या गजऱ्याचे दोन भाग केले. एक भाग केसात माळला आणि दुसरा प्लॅस्टिक बॅग मध्ये ठेऊन तो तिच्या हँडबॅगमध्ये ठेवला. जेणेकरून ती एअरपोर्टवर उतरल्यावर पुन्हा केसात माळू शकेल. नव्याला माहीत नव्हतं की, अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला फुलं नेणं कायद्याच्या विरोधात आहे. मेलबर्न एअरपोर्टवरील अधिकाऱ्यांनी तिची बॅग तपासली, तेव्हा चमेलीची फुलं पाहून त्यांनी तिला थांबवलं आणि लगेच दंड ठोठावला.
कार्यक्रमात याबाबत बोलताना नव्या म्हणाली की, “मला माहीत आहे की, मी चूक केली, पण ती जाणूनबुजून केलेली नव्हती. मी माझ्या वडिलांनी प्रेमाने दिलेला गजरा घेऊन जात होते. त्यांनी मला 28 दिवसांच्या आत हा दंड भरण्यास सांगितलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List