Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे नुकत्याच उघड झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात तिन संशयितांच्या न्यायालयाने पोलीस कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे. तर या हत्याकांड एका संशयितांची न्यायालयीन पोलीस कोठडी रवानगी करण्यात आली.

दुर्वास दर्शन पाटील (वय २५, रा. जंगमवाडी, वाटद-खंडाळा, रत्नागिरी), विश्वास पवार (वय ४१, रा. कळझोंडी-बौद्धवाडी, रत्नागिरी) व सुशांत शांताराम नरळकर (वय ४०, रा. आदर्शनगर, वाटद-खंडाळा, रत्नागिरी) अशी कोठडीत वाढ झालेल्या संशयितांची नावे आहे. ही घटना शनिवारी (ता. ३०) दुपारी बाराच्या सुमारास आंबाघाट येथे उघडकीस आली होती.

मिरजोळे येथील भक्ती मयेकर या या तरुणीच्या खुनाचा उलगडा झाला होता. भक्ती मयेकर हिच्या खुनाचा उलगडा होताच एका पाठोपाठ एक तीन खून झाल्याचे निष्पन्न होताच संपूर्ण जिल्हा हादरला. भक्ती मयेकर हिचा खून करून दुर्वास पाटील याने तिचा मृतदेह आंबा घाट येथे फेकला होता. या खुनाचा उलगडा झाल्यानंतर दुर्वास पाटील याना भक्ती मयेकर हिच्यासह अन्य दोघांचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले. तिघांपैकी एकाचा मृतदेह अद्यापही आढळून आलेला नाही. आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने दुर्वास पाटील याने तीनही मृतदेहांची विल्हेवाट लावल्याचे समोर आले.

अटक करण्यात आलेल्या चारपैकी दुर्वास पाटील, सुशांत नरळकर, विश्वास पवार यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आणखीन चार दिवसांची म्हणजेच ११ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्याकांड मधील चौथा संशयित निलेश भिंगार्डे याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;