शाकाहार की मांसाहार, प्रथिनांचा कोणता स्रोत आरोग्यासाठी उत्तम?
प्रथिने हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे. प्रथिने स्नायू तयार करण्यासाठी आणि हाडे आणि त्वचेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक मानले जाते. अशा परिस्थितीत, शरीरात प्रथिने असणे खूप महत्वाचे आहे. शरीरात प्रथिनांचे प्रमाण व्यक्तीच्या वजनावर अवलंबून असते. प्रथिने अनेक अन्नपदार्थांमध्ये आढळतात, जे प्रथिनांचे प्रमाण पूर्ण करण्यासाठी तुमच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात.
शाकाहार आणि मांसाहार हे दोन्हीही प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत. दोघेही शरीराला प्रथिने तसेच इतर अनेक पोषक तत्वे प्रदान करतात. काही लोक शाकाहरी प्रथिनांना चांगले मानतात तर काही मांसाहारी प्रथिनांना प्राधान्य देतात.
शाकाहारी प्रथिनांसाठी आहारात डाळी, काजू, टोफू आणि भाज्यांचा समावेश करू शकता. दुसरीकडे, मांसाहारी प्रथिनांमध्ये अंडी, मांस, मासे यांचा समावेश आहे. दोन्ही प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत.
मांसाहारी प्रथिनांचे फायदे
मांसाहारी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी12, लोह आणि ओमेगा 3 सारखे अनेक पोषक घटक असतात. जे स्नायूंना टिकवून ठेवण्यास मदत करतात आणि एकूण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. तुम्हाला मांस, मासे, अंडी यांमधून प्रथिने मिळू शकते. मांसाहारी पदार्थांतील प्रथिनांमध्ये ओमेगा ३ आढळते, जे मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. तसेच हे सर्व मेंदूचे आरोग्य आणि लाल रक्तपेशी वाढविण्यास मदत करतात.
शाकाहारी प्रथिनांचे फायदे
शाकाहारी प्रथिने वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या गोष्टींपासून मिळते, ज्यामध्ये धान्ये, फळे, भाज्या, काजू आणि बीन्स इत्यादींचा समावेश आहे. स्नायूंना बळकटी देण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे हाडांची घनता देखील सुधारते. वनस्पती-आधारित प्रथिनांमध्ये अनेक प्रकारचे पोषण देखील असते, ज्यामध्ये फायबर, चरबी, कार्बोहायड्रेट्स असतात.जे पचनक्रियेला मदत करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते. जर तुम्हाला फक्त प्रथिने घ्यायची असतील तर प्राण्यांचे प्रथिनं हा एक उत्तम पर्याय आहे.
कोणते प्रथिने चांगले आहे?
प्राण्यांपासून तयार पदार्थांमधील प्रथिनांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. म्हणून जर तुमचे कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही प्राण्यांपासून बनवलेल्या प्रथिनांचे सेवन कमी करावे. दुसरीकडे कोलेस्टेरॉलची पातळी ठीक असेल तर तुम्ही आहारात दोन्ही प्रकारच्या प्रथिन स्रोतांचा समावेश करू शकता. दोन्ही प्रथिनांचे महत्त्व वेगळे आहे. तुमच्या शरीराच्या प्रकारानुसार आणि गरजेनुसार प्रथिनांचे सेवन करा आणि दोन्ही प्रथिन स्रोतांना तुमच्या आहाराचा भाग बनवा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List