देशात पाळीव प्राण्यांची तस्करीत 5 वर्षांत 4 पट वाढली, मुंबईत सर्वाधिक प्रकरणे
देशात विदेशी नस्लांच्या कुत्र्यांसह इतर विदेशी पाळीव प्राण्यांच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या वाढत्या मागणीमुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्राण्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ज्यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका देखील वाढला आहे. गेल्या पाच वर्षांत जिवंत प्राण्यांच्या तस्करीच्या घटनांमध्ये गेल्या 5 वर्षांत 4 पट वाढ झाली आहे, असे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे.
या वृत्तानुसार, मुंबई विमानतळावर यावर्षी जानेवारी ते जुलै २०२५ या कालावधीत ३७७ विदेशी प्राण्यांची तस्करी पकडण्यात आली आहे. ज्यामध्ये साप, कासव, सरडे, माकडे आणि दुर्मीळ पक्षी यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश प्राणी थायलंडमधून बेकायदेशीरपणे आणले गेले. उदाहरणार्थ, ३१ मे २०२५ रोजी थाय एअरवेजच्या फ्लाइट टीजी ३१७ ने बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून ५२ विदेशी सरपटणारे प्राणी जप्त करण्यात आले, ज्यात तीन स्पायडर-टेल्ड हॉर्न्ड व्हायपर्स, पाच एशियन लीफ टर्टल्स आणि ४४ इंडोनेशियन पिट व्हायपर्स यांचा समावेश होता. यापैकी एक साप मृतावस्थेत आढळला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List