Ratnagiri News- हळदी समारंभातून दारू हद्दपार; देवडे चिंचवलकरवाडीचा क्रांतिकारी निर्णय
संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावातील चिंचवलकरवाडीने लग्नातील अनिष्ट आणि खर्चिक प्रथांना थारा न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. स्थानिक ग्रामस्थ, मुंबईतील रहिवासी आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. विशेष म्हणजे, हळदीच्या कार्यक्रमात दारू देण्याची प्रथा तात्काळ बंद करण्यात आली असून, नियम मोडणाऱ्यांच्या लग्नसमारंभात गावकरी सहभागी होणार नाहीत, असेही ठरवण्यात आले आहे.
बैठकीत लग्न सोहळ्यातील विविध प्रथांना बंदी घालण्यात आली त्यासोबतच यामध्ये लग्राचा बस्ता घ्यायला फक्त घरातील सदस्य आणि वाडीतील एक-दोनच व्यक्ती जातील. घरबघणीच्या कार्यक्रमात जेवणाचा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ही प्रथा रद्द करण्यात आली. लग्नाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या हळदीत दारू व मांसाहारास सक्त मनाई करण्यात आली. जर लग्र मुंबईत असेल, तर हळदीला फक्त शेजारी-मित्र यांनाच बोलावायचे. हळद उत्तरवणी कार्यक्रमातही दारूला बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडल्यास गावकरी लग्नकार्यात सहभागी होणार नाहीत.
या बैठकीत मंडळाचे अध्यक्ष दयानंद चिंचवलकर अध्यक्षस्थानी होते. डॉ. शशिकांत चिंचवलकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता चिंचवलकर, सोमलिंग स्पोटूर्स सचिव गौरव चिंचवलकर, तसेच आत्माराम चिंचवलकर, सुरेश चिंचवलकर, विजय चिंचवलकर, बाळकृष्ण जाधव, सुरेश तळेकर, कांशीराम माईल, शांताराम नलावडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List