चंद्रभागेला महापूर; नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली, 300 कुटुंबाचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने, पुणे व सातारा जिल्ह्यातील धरणामधील अतिरिक्त पाणी भीमा नदीत सोडले जात आहे. सुमारे पावणे दोन लाख क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू असल्याने पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला महापूर आला आहे. नदीच्या पात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे, समाध्या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदी काठच्या 300 हून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. प्रांताधिकारी सचिन इथापे मुख्याधिकारी महेश रोकडे आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
चंद्रभागेला महापूर; नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली, 300 कुटुंबाचे सुरक्षित स्थळी स्थलांतर pic.twitter.com/yUBlxqJTTJ
— Saamana Online (@SaamanaOnline) August 21, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List