अहिल्यानगरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, सात शेळ्यांचा फडशा पाडला
राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून शुक्रवारी सायंकाळी सात शेळ्यांचा फडशा पाडला. येवले आखाडा, राहुरी सुत गिरणी परिसरात ही घटना घडली. राखणदार म्हणून राहणाऱ्या माणिक आसरु सोनटक्के उर्फ माळीबाबा यांच्या राहत्या घरी त्यांच्या मालकीच्या एकूण सात जनावरांवर हल्ला करत पाच शेळ्या व दोन बोकड ठार केले.
शेळ्यांचा आरडाओरडा ऐकून धावले असता बिबट्याने माळी बाबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि एक शेळी घेऊन पळ काढला. त्यावेळी मदतीस आलेले आकाश हारदे यांनी स्थानिक नगरसेवक, वन विभाग अधिकारी आणि तहसीलदारांना फोन करून घटनेची माहिती दिली. वनविभाग अधिकाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखत कर्मचाऱ्यांना पाठवून तात्काळ पंचनामा केला.
माळी बाबा यांचे कमीत कमी लाख ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी तहसीलदार तसेच वनविभाग अधिकारी यांनी माळीबाबा यांना 45 दिवसांच्या आत पूर्णपणे मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List