बघेल कुटुंबाच्या तीन पिढ्या बघितलेला कैदखाना, रायपूरच्या तुरुंगातील बॅरेकची खरपूस चर्चा
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल मद्य घोटाळ्या प्रकरणी तुरुंगावास भोगत आहे. त्याला रायपूर केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आले आहे. या कारागृहातील एक बॅरेक सध्या चर्चेत आला आहे. कारण चैतन्य बघेल याला ज्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे, त्याच बॅरेकमध्ये त्याचे वडील भूपेश बघेल आणि दिवंगत आजोपा नंदकुमार बघेल यांनाही ठेवण्यात आले आहे. कैदखान्यातील दुर्मिळ योगायोगाची सध्या छत्तीसगडच्या राजकारणात खरपूस चर्चा सुरू आहे.
नंदकुमार बघेल
भूपेश बघेल यांची वडील नंदकुमार बघेल यांना 2021 मध्ये ब्राह्मण समाजाविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे अटक करण्यात आली होती. त्यांनी लिहिलेल्या ‘ब्राह्मण कुमार रावण को मत मारो’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादानंतर त्यांना आग्रामध्ये अटक करून रायपूरच्या केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांचेच सरकार होते. नंदकुमार बघेल यांना त्यावेळी ज्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते त्याच बॅरेकमध्ये त्यांचा नातू चैतन्य यालाही ठेवण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List