Ganeshotsav 2025 – यंदा ‘मुंबईच्या राजा’साठी रामेश्वरम मंदिराची प्रतिकृती

Ganeshotsav 2025 – यंदा ‘मुंबईच्या राजा’साठी  रामेश्वरम मंदिराची प्रतिकृती

मुंबईचा राजा’ अशी ख्याती असलेल्या लालबागच्या गणेशगल्लीत यंदा तामीळनाडूमधील रामेश्वरम मंदिराची भव्यदिव्य अशी प्रतिकृती उभारण्यात येत आहे. 40 फूट उंच आणि 160 फूट रुंद असे हे मंदिर आहे. मंदिर परिसरातील 12 पुंडांचाही देखाव्यात समावेश असणार आहे. प्रवेशद्वारासमोर मोठा नंदी असणार आहे.

‘मुंबईचा राजा’ मंडळाचे यंदाचे 98वे वर्ष आहे. मंडळातर्फे दरवर्षी मंदिरांसह ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांचा देखावा मुंबईच्या राजासमोर उभारण्यात येतो. ज्या भक्तांना वेळेअभावी वा पैशाअभावी विविध मंदिरे तसेच तीर्थक्षेत्र पाहता येत नाहीत त्यांच्यासाठी मंडळाच्या वतीने ही संकल्पना दरवर्षी राबवली जाते, असे मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी सांगितले.

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक कुणाल साबळे हे मंदिराची प्रतिकृती उभारणार असून बाप्पाची 22 फुटांची भव्य दिव्य मूर्ती आकाश तिरमल हे नव्या दमाचे मूर्तिकार साकारणार आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांची फौज

सुरक्षेच्या बाबतीत यंदाही योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे क्लोज सर्किट पॅमेरे, जागोजागी व्हॉलिंटीयर आणि सुरक्षा रक्षकांची फौज तैनात असणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;