Health Tips – अंगकाठी खूपच बारीक असेल तर, आहारात हे पदार्थ समाविष्ट करा आणि निरोगी राहा

Health Tips – अंगकाठी खूपच बारीक असेल तर, आहारात हे पदार्थ समाविष्ट करा आणि निरोगी राहा

वजन वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपली दिनचर्या बदलणे. आजकाल वजन कमी करण्याच्या नादात वजनाशी संबंधित एका समस्येकडे क्वचितच आपले लक्ष वेधले जाते आणि ते म्हणजे वजन कमी होणे. वजन कमी झाल्यामुळे मुलांमध्ये कुपोषण आणि महिलांमध्ये अशक्तपणाची समस्या उद्भवते.

वजन कमी असण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक कारण आहाराकडे दुर्लक्ष करणे हे असू शकते. वजन वाढविण्यासाठी पावडर किंवा बाजारात उपलब्ध असलेली कोणतीही औषधे वापरण्यास सुरुवात केली असेल तर, त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

वजन वाढविण्यासाठी काय खायला हवे?

शेंगदाणा

शेंगदाण्यामध्ये भरपूर कॅलरी आणि फॅट असते, त्यामुळे वजन वाढवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे मानले जातात. शेंगदाणे आणि मनुके रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात खा. तुम्ही त्याचे पाणी पिऊ शकता. याशिवाय वजन वाढवण्यासाठी तुम्ही नाश्त्यामध्ये पीनट बटर आणि ब्रेडचाही समावेश करू शकता. वजन वाढविण्यासाठी जिम ट्रेनर्स अनेकदा पीनट बटर खाण्याचा सल्ला देतात.

Health Tips – सोडा मिसळलेले पाणी का प्यायला हवे,वाचा

केळी

रोज केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. तुम्ही रोज 4 केळी खाऊ शकता. वजन वाढवण्यासाठी केळी खूप महत्त्वाची आहेत. केळ्यामध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात. तसेच फ्रुक्टोज (फळांमधून साखर) चे प्रमाण इतर फळांपेक्षा जास्त असते, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

अंडी

अंड्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असल्यामुळे अंडी वजनवाढीसाठी उत्तम आहार म्हणून ओळखला जाते. अंड्यांमध्येही भरपूर फॅट असते, जे वजन वाढवण्यास मदत करते. तुम्ही तुमच्या आहारात रोज 6 उकडलेल्या अंडी समाविष्ट करू शकता. तुम्हाला हवे असल्यास काहींचे अंड्यातील पिवळ बलक काढून त्याचे सेवन करू शकता.

बेदाणा
बेदाण्यामध्ये भरपूर पोषक असतात त्यामुळे याचे रोज सेवन केले तर ते तुमचे वजन निरोगी पद्धतीने वाढवण्यास मदत करेल. बेदाणे कोरडे आणि भिजवून दोन्हीही पद्धतीने खाणे केव्हाही उत्तम.

Acidity Home Recmedies – वरचेवर होणाऱ्या अॅसिडिटीला आता करा कायमचा रामराम

दूध

निरोगी राहण्यासाठी आणि कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला दूध घेण्याचा सल्ला दिला जातो. वजन वाढवायचे असेल तर फुलफॅट दूधाचे सेवन करा. दुधात प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फॅट देखील असतात, त्यामुळे वजन वाढते. तुम्ही बदाम, अंजीर, खजूर यांसारखे ड्रायफ्रूट्स दूधामध्ये घालू शकता. त्यातून अतिरिक्त कॅलरीज मिळतील आणि निरोगी पद्धतीने वजन वाढवता येईल.

 (कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जगात कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही; शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा जगात कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही; शी जिनपिंग यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाच्या 80 व्या वर्षानिमित्त चीनची राजधानी बीजिंगमध्ये भव्य लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले होते. चीन दरवर्षी 3...
अंबरनाथमध्ये केमिकल लोच्या.. 50 हजार नागरिकांचा जीव धोक्यात
अंबरनाथ, बदलापूरच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस, 190 जणांनी नोंदवला आक्षेप
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री कुठे होते? संजय राऊत यांचा सवाल
दिलं म्हणायचं आणि तोंडाला मात्र लागू द्यायचं नाही हीच स्वयंघोषित चाणक्यांची कूटनीती, रोहित पवार यांची टीका
मनोज जरांगे पाटील यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर त्यांचेही अभिनंदन – संजय राऊत
सौंदर्यासाठी गुलाबजल का आहे महत्त्वाचे?