मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील 3 तास धोक्याचे, मुंबई, ठाणे, पालघरसह 5 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट
मुंबईत आणि परिसरात पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने आज दुपारी 4 वाजता मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे. हा इशारा पुढील 3 तासांसाठी देण्यात आला आहे. या काळात 40 ते 50 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हा वेग 60 किमी/तासपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या पावसामुळे रस्ते वाहतूक, विमान सेवा आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामानाशी संबंधित अद्ययावत माहितीसाठी बीएमसी आणि हवामान विभागाच्या अधिकृत संदेशांकडे लक्ष ठेवावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List