विदर्भात पावसाचा कहर; अनेक मार्ग बंद, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

विदर्भात पावसाचा कहर; अनेक मार्ग बंद, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

संततधार बरसलेल्या पावसामुळे विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात नदी, नाल्यांना पूर आला आहे. इसापूर धरणाचे नऊ, सातनालाचे तीन, काटेपूर्णाचे सहा, पेनटाकळीचे नऊ तर खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडण्यात आले आहेत.सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्वाचे मार्ग प्रशासनाने बंद केले. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

दोघांचा मृत्यू..

पुरात वाहून गेल्याने यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे धोका टाळण्यासाठी चिखली तालुक्यातील शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पूरपरस्थितीमुळे १३ मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प पडली होती. सलग दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती सोमवारीही कायम होती.

या धरणाचे उघडले दरवाजे….

खडकपूर्णा (संत चोखा सागर) चे १९पैकी १५ वक्रद्वारे ५० सेंटीमीटने उघडण्यात आले आहेत. चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मेहकर तालुक्यातील डोणगावसह शेंदला, उकळी सुकळी, सोनाटी येथे घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आले. डोणगावजवळील कांचनगंगा नदीला पूर आल्याने सोमवारी सकाळी सात वाजेपासून ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत मुंबई ते नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. देऊळगाव साकर्शा येथील नदीच्या पुलावर साइड भराव पुर वाहून गेल्याने मेहकर-अकोला मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. चिखली शहरात तर पावसाने कहरच केला. शहरातून जाणाऱ्या आणि लगतच्या नद्यांची रुंदी कमी झाल्याने शहराच्या काही भागातून पुराचे पाणी वाहू लागले. काही ठिकाणी कमरेएवढे पाणी वाहत होते. रायपूर भागात अतिवृष्टी झाल्याने नदीला पूर आला. पुढे हातणी गावाजवळ नदीचे पाणी राम नदीला मिळाले. पुलावरून पाणी वाहू बुलढाणा-चिखली लागल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज ते शेलगाव जहागीर, तेल्हारा फाटा ते गाव, भोरसा आणि भोरसी गाव, हातणी ते सवणा, अंचरवाडी फाटा ते गाव, बोरगाव फाटा ते गाव, उद्यनगर ते डासाळा या गावांचा पुरामुळे संपर्क तुटला होता.

शेळ्यांना चारा आणणे बेतले जीवावर…

शेळगाव आटोळ येथील चेतन वसंत बोर्डे (२२) हा तरुण १७ ऑगस्टला शेळ्यांना पाला आणण्यासाठी गाव शिवारात गेला होता. दुपारी एकच्या सुमारास नदी पार करताना पाय घसरून तो पुरात वाहून गेला. एक किलोमीटर अंतरावर सुभाष मिसाळ यांच्या शेताजवळील सिमेंटच्या बांधाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. सिंदखेड राजा तालुक्यातील जांभोरा येथील पाझर तलाव शनिवारी फुटल्याने शेकडो एकरावरील पिके शेतजमिनीसह वाहून गेली. दोन दिवस शाळांना सुट्टी अतिवृष्टीमुळे चिखली तालुक्यात जनजीवन प्रभावित झाले आहे. संभाव्य धोके लक्षात घेता तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना १८ आणि १९ ऑगस्ट असे दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

पैनगंगेत पोहून जात दिला किराणा…

पेनटाकळी व कोराडी प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने मेहकरजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आला. नदीच्या पलीकडील भागात जनार्दन गोविंद केळे यांच्या शेतात सालदार माहिती मिळाल्यानंतर महसूल विभाग व कुटुंब अडकून पडले. याविषयीची मेहकर नगरपालिका प्रशासनाने तीन दिवस पुरेल एवढे किराणा सामान पाठविण्याचे ठरविले. शेख मनसब शेख अमीन (२१) हा तरुण समीर आला. त्याने पाठीवर किराणा बांधून पैनगंगा नदी पोहत पार केली.

अकोला जिल्ह्यात पुरस्थिती..

अकोला जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने महान येथील काटेपूर्णा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. यासोबतच बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, बाळापूर, पातूर, अकोट, तेल्हारा तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. मन, मोर्णा, पूर्णा, काटेपूर्णा, निर्गुणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

इसापूर धरणाचे नऊ दरवाजे उघडले…

यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील इसापूर धरणाचे १३पैकी नऊ तर तेलंगणमधील सातनाला धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आल्याने पैनगंगा आणि वर्धा नदीला पूर आला आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असल्याने दोन दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चंद्रपूर जिल्हातील 13 मार्ग बंद…

पुरामुळे जवळपास १३ मार्गांवरील वाहतूक सोमवारी बंद होती. यात प्रामुख्याने चंद्रपूर तालुक्यातील बल्लारपूर-विसापूर, अंतरगाव, गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव-सरांडी मार्गाचा समावेश आहे. तालुकानिहाय विचार करता चंद्रपूर दोन, गोंडपिपरी पाच, राजुरा तीन, कोरपना दोन तर बल्लारपूरमधील एक रस्ता बंद होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं
अनेकांना झोपण्याआधी अंघोळ करण्याची किंवा सकाळी काही नाश्ता करून मग थोड्यावेळाने अंघोळ करण्याची सवय असते. पण काहीजण कधी कधी काही...
Video नांदेडमधील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाची वाट खडतर, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे भाविकांचे हाल
GSTच्या नावाखाली मध्यमवर्गीयांची कमाई चुरून खाल्ल्यावर आता केंद्राला बदल करण्याचे सुचले, अंबादास दानवे यांची टीका
नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल