मानेवरील काळपटपणा छुमंतर; तुरटीचा करा असा वापर

मानेवरील काळपटपणा छुमंतर; तुरटीचा करा असा वापर

त्वचेची काळजी न घेतल्याने त्यासंबंधीचे आजार होतात. संसर्गसारख्या समस्या होतात. त्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते. त्वचेचा काळपटपणा वाढतो. त्यात चेहरा निस्तेज दिसतो. तर मान आणि गळ्यावरील त्वचा काळपट दिसते. ती इतकी काळी होते की, ती वजरीने घासून वा साबण लावून निघत नाही. मग घरात अनेक प्रयोग सुरू होतात. पण त्यामुळे तिथली त्वचा ही भाजते अथवा चरचर होते. घरातील तुरटीचा वापर करून तुम्ही गळ्याचा काळपटपणा कमी करू शकता.

तुरटीने हटवा काळपटपणा

तुरटीच्या मदतीने तुम्ही मानेवरील काळपटणा दूर करू शकता. तुरटीच्या मदतीने मानेवरील मळच नाही तर काळपट थर कमी करू शकता. त्या ठिकाणी एक नैसर्गिक चमक आणू शकता. त्यासाठी तुरटी हा जालीम उपाय आहे. तुरटीमुळे मानेवरील खिळ आणि मस सुद्धा कमी होतात. भारतात अनेक वर्षांपासून तुरटीचा वापर करण्यात येतो. पाणी स्वच्छ करण्यापासून ते त्वचेसाठी तुरटीचा वापर होतो. तुरटीचा वापर करण्यापूर्वी ती चांगली धुवून काढा. त्यानंतर 5 मिनिटांपर्यंत तुरटी हळुवारपणे त्वचेवरून फिरवा. हलक्या हाताने ती घासा. तुरटी त्वचेवर रगडू नका. त्यानंतर साध्या पाण्याने पुन्हा मान, गळा धुवून काढा.

किती दिवस लावावी तुरटी

मान आणि गळ्यावरील काळपटपणा घालवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुरटीचा वापर करू शकता. तुमच्या मानेवरील काळपटा जस जसा कमी होईल. तुरटीचा वापर कमी करा. जर काळपटपणा पूर्णपणे गेला तर मग तुरटीचा वापर करणे बंद करा. दीर्घकाळ तुरटीचा वापर हा शरीराला अपायकारक ठरतो. तुरटीचा अतिरेक टाळा.

या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

तुरटीचा वापर करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. जर तुरटी लावल्यानंतर तुमच्या त्वचेची जळजळ अथवा आग होत असेल तर तुरटीचा वापर लागलीच थांबवा. तुरटी रोज त्वचेवर लावू नका. तुरटीचा वापर करतानी ती रगडू नका. तुरटीचा तुकडा लावताना त्याला कनोर तर नाही ना, याची खात्री करा, नाहीतर त्वचा चिरण्याची भीती असते. कोरड्या त्वचेवर तुरटी आजिबात लावू नका. त्वचा ओली केल्यावर त्यावर तुरटी फिरवा.

Disclaimer: ही केवळ उपलब्ध स्त्रोतांआधारे दिलेली माहिती आहे. याविषयी टीव्ही 9 कोणताही दुजोरा देत नाही. वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या! बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या!
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यावर सरकार अद्याप कोणताही तोडगा काढू शकलेले नाही....
जिनपिंगशी सूर जुळले… मोदींचे चीन चीन चू!
सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी
आली गवर सोनपावली…
सामना अग्रलेख – न्या. नागरत्ना, धन्यवाद!
दिल्ली डायरी – चंद्राबाबू ‘तेलगू बीडा’ उचलणार का?
विज्ञान रंजन – डौलदार लाल फूल!