हिंदुस्थानी लष्करात आता भैरव कमांडो, पाकिस्तान आणि चीन सीमेवर तैनात होणार
शत्रूंना सळो की पळो करून सोडण्यासाठी हिंदुस्थानी लष्करात आता नवीन भैरव कमांडो बटालियन तैनात करण्यात येणार आहे. सुरुवातीला यामध्ये एकूण पाच बटालियन बनवली जाणार आहेत. ज्यामध्ये प्रत्येक बटालियनमध्ये 250 प्रशिक्षित आणि आधुनिक शस्त्र असलेले कमांडो असणार आहेत. हे कमांडो पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात केले जाणार आहेत. नव्या भैरव कमांडोमुळे आता शेजारच्या शत्रू राष्ट्रांना धडकी भरायला लागू शकते. 31 ऑक्टोबरपर्यंत पाच युनिट पूर्णपणे तयार केली जातील, असे लक्ष्य लष्कराने ठेवले आहे. सध्या लष्कराकडे 415 इन्फेंट्री बटालियन आहेत. ज्यामध्ये जवानांपासून विशेष युनिटची स्थापना केली जाणार आहे. ही बटालियन रेग्युलर इन्फेंट्री आणि स्पेशल फोर्सेस यादरम्यान जी कमतरता भासत होती ती पूर्ण होऊ शकते. याला हायटेक शस्त्र, आधुनिक उपकरणे आणि ड्रोनने सज्ज केले जाणार आहे.
संवेदनशील मिशनवर तैनात
ही युनिट लष्कराच्या 10 व्या पॅरा स्पेशल फोर्सेज आणि पाचवी पॅरा (एयरबोर्न) बटालियन शिवाय कार्य करतील. स्पेशल फोर्सेस नेहमी कठीण आणि संवेदनशील मिशनवर तैनात केल्या जातात. त्यामुळे भैरव बटालियनची स्थापना सुद्धा स्पेशल फोर्सेसच्या मुख्य कार्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी करण्यात आली आहे. भैरव कमांडोला पहिले दोन ते तीन महिने प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर एक महिन्यासाठी विशेष फोर्सेज युनिट सोबत तैनात केले जाईल.
31 ऑक्टोबरला पहिली बटालियन
भैरव कमांडो बटालियन 31 ऑक्टोबरला तैनात केली जाण्याची तयारी केली जात आहे. तीन बटालियन उत्तरी कमान अंतर्गत तैनात केली जातील. लेहमध्ये 14 कोर, श्रीनगरमध्ये 15 कोर, आणि नगरोटामध्ये 16 कोरसाठी तैनात केली जाईल. चौथी बटालियन पश्चिम सीमेच्या रेगिस्तान परिसरात बनवली जाईल. तर पाचवी युनिट पूर्व सेक्टरच्या डोंगराळ भागात सक्रीय केली जाईल. भैरव बटालियनमध्ये जवळपास सात ते आठ अधिकारी असतील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List